घरताज्या घडामोडीदिल्लीत कोरोनाचा कहर; मास्क न घातल्यावर २ हजार रुपयांचा दंड!

दिल्लीत कोरोनाचा कहर; मास्क न घातल्यावर २ हजार रुपयांचा दंड!

Subscribe

देशाची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरस प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या देखील झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील केजरीवाल सरकारने मास्क न घालण्यावर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या दृष्टीकोनातून सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यापूर्वी दिल्लीत मास्क न घालण्यावर ५०० रुपये दंड होते, आता या दंडाची किंमत वाढवली असून २ हजार रुपये केली आहे. दिल्लीत वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी लोकांना घरात छटपूजा साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ‘लोकांनी छट पूजा आपल्या-आपल्या घरात साजरी करावी, अशी माझी इच्छा आहे.’

- Advertisement -

अरविंद केजरीवाल झालेल्या सर्वपक्षीय बैठकबाबत म्हणाले की, ‘अशा कठीण काळात आपण सर्वांनी एक झाले पाहिजे आणि लोकांची सेवा केली पाहिजे, हे सर्व राजकीय पक्षांनी मान्य केले आहे. अशा परिस्थितीत राजकीय मुद्दा नसावा. राजकारण करण्यासाठी आणखीन वेळ येईल. आपण काही दिवस आरोप-प्रत्यारोप बंद करायला पाहिजे.’ या सर्वपक्षीय बैठकीत भाजप आणि काँग्रेसने देखील आपापले मत मांडले आहे. छटपूजा बाबत बैठकीत दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कुमार यांनी केजरीवाल यांना एक पत्र दिले होते. यामध्ये अशी मागणी केली होती की, ‘छट पूजेसाठी सूट देण्याच्या मुद्दय़ावर दिल्ली उच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करावी अशी विनंती केली आहे.’


हेही वाचा – सीबीआय चौकशीसाठी राज्याची संमती आवश्यक – सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -