घरदेश-विदेशदिल्लीचा २० वर्षीय मर्चंट नेव्ही कॅडेट मॉरिशसमधील बोटीवरुन बेपत्ता

दिल्लीचा २० वर्षीय मर्चंट नेव्ही कॅडेट मॉरिशसमधील बोटीवरुन बेपत्ता

Subscribe

दिल्लीत हणाऱ्या २० वर्षीय मर्चंट नेव्ही कॅडेट धनंजय अरोरा मागच्या पाच दिवसांपासून मॉरीशस मधील एका बोटीवरुन बेपत्ता झाला आहे. धनंजयचे कुटुंबिय मागच्या पाच दिवसांपासून त्याचा शोध घेण्यासाठी विविध शासकीय यंत्रणेच्या मागे विनवण्या करत आहेत. मात्र ज्या बोटीवर तो होता, त्यांनी चार दिवसांपासून सुरु असलेले तपासकार्य थांबवले. अखेर अरोरा कुटुंबियांनी प्रधानमंत्री कार्यालय आणि गृह मंत्रालयाला मदतीची विनंती केली. तसेच फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या सोशल माध्यमांवर धनंजयचा फोटो व्हायरल करत मदतीची हाकही दिली. ‘मला तात्काळ मदत हवीये’, असा मेसेज धनंजयने बेपत्ता होण्यापूर्वी त्याची बहिण रियाला केला होता. दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता त्याला शिपवर शेवटचे पाहिले गेले होते.

रिया ही दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी आहे. आपला भाऊ धनंजयचा शोध घेण्यासाठी तिने विविध सोशल मीडिया साईटवर पोस्ट टाकल्या आहेत. रिया म्हणाली की, “माझ्या भावाने मला शेवटचा मेसेज केला होता. मला मदत हवी आहे, असे म्हणत त्याने त्याच्या वरिष्ठाचे अनेक फोटो मला पाठवले. धनंजयने मला फोन करुन त्याचा छळ केला जात असल्याचे सांगितले होते. मी परत आल्यानंतर शिपमधील अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही तो म्हणाला होता. मी त्याला कामावर लक्ष दे, असे सांगितले होते.”

- Advertisement -

📢📢📢HELP HELP HELP!!📢📢📢My brother, Cadet Dhananjay Arora from Jhilmil Colony, Delhi and a vibrant boy with dreams in…

Posted by Riya Arora on Wednesday, September 16, 2020

आमच्यामध्ये तेच शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर त्याच रात्री १० वाजता आम्हाला शिपवरील अधिकाऱ्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की धनंजय शिपवर नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये धनंजयने घर सोडले होते. पुढच्या महिन्यातच तो आपला २१ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी येणार होता. धनंजयचा चुलत भाऊ करुणेश्वर म्हणाला की, “आम्हाला धनंजयचा खूप अभिमान आहे. मर्चंट नेव्हीमध्ये कामाला लागणारा आमच्या कुटुंबातील तो पहिलाच व्यक्ती. तो एक हुशार आणि मेहनती मुलगा आहे. त्याच्यासोबत काय झालंय याची काहीच कल्पना नाही. तो ऑगस्टमध्येच घरी येणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्याची ट्रीप पुढे सरकली.”

- Advertisement -

धनंजय हा हाँगकाँगस्थित FLEET मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये नॅव्हिगेटिंग अधिकारी म्हणून काम करत होता. इलेगेन्ट मरिन सर्व्हिसेस प्रा.लि. या मुंबईतील कंपनीने त्याची या कामासाठी निवड केली होती. शुक्रवारी फ्लिट मॅनेजमेंटने एक पत्रक जाहीर करुन MT New Horizon या शिपवरुन धनंजय हरविल्याबाबत दुःख व्यक्त केले. चार दिवस आम्ही तपासकार्य करुनही त्याचा तपास लागला नाही, त्यामुळे नाईलाजाने आम्ही बचावकार्य थांबवले, असल्याचे सांगितले.

दरम्यान धनंजयच्या कुटुंबियांनी कंपनीतर्फे कुणीही त्यांच्याशी बोलत नसल्याचा आरोप केला. तसेच फक्त शिपच्या जहाजावरील कॅप्टनने त्यांना एकदा फोन करुन सांगितल्यानंतर पुन्हा कुणीही संवाद साधला नसल्याचाही आरोप केला. तसेच परराष्ट्र खात्याला लिहिलेल्या पत्राचेही त्यांना उत्तर मिळालेले नाही. धनंजयला समुद्राची खूप आवड होती. त्याचे काम आणि प्रवासाबाबत तो खूप उत्साही असायचा, अशी प्रतिक्रिया रियाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -