घरदेश-विदेशदिल्लीत प्रदूषणामुळे ११३ कंपन्या बंद करण्याचे निर्देश

दिल्लीत प्रदूषणामुळे ११३ कंपन्या बंद करण्याचे निर्देश

Subscribe

प्रदूषण पसरवणाऱ्या कंपनीविरोधात १३६८ कारणे दाखववा नोटीस दाखल करण्यात आली आहे. तर ४१७ कंपनींना बंद करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये हवेचा दर्जा मोठ्याप्रमाणात घसरला आहे. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे दिल्लीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिल्लीतील हवेचा दर्जा खराब झाल्याचे लक्षात घेता अधिकाऱ्यांनी पाइप पाकृतिक गॅस (पीएनजी) ला वापरात न आणल्यामुळे ११३ उद्योगांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ११३ उद्योगांमध्ये ६७ उद्योग बवाना आणि नरेला उद्योग क्षेत्रामध्ये आहेत. केंद्रीय पर्यावरण नियंत्रण बोर्ड (सीपीसीबी) च्या आकडेवारीनुसार, एक्यूआई ३४८ दर्शवली आहे. म्हणजे दिल्लीमध्ये हवेचा दर्जा खूप खराब असल्याचे दर्शवले आहे.

कंपन्यांवर कारवाईला सुरुवात

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी नायब राज्यपालांना सांगितले की, प्रदूषण पसरवणाऱ्या कंपनीविरोधात १३६८ कारणे दाखववा नोटीस दाखल करण्यात आली आहे. तर ४१७ कंपनींना बंद करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या बैठकीनंतर पीएनजी न वापरणाऱ्या ११३ कंपन्यांना बंद करण्याचे आदेश नायब राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. नायब राज्यपालांनी दिल्लीतील वाढते प्रदूषणाला लक्षात घेता पर्यावरण मार्शल मोठ्या संख्येने तैनात केले जावे असे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

दिल्लीचा हवेचा दर्जा घसरला

दिल्लीमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चालले आहे. सकाळी धुळ आणि धूराची मोठी चादर दिल्लीमध्ये पसरलेली असते. बांधकाम, वाहनांपासून होणारे प्रदूषण, पंजाब -हरियाणामध्ये पराली जाळल्याणे दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर वाढत आहे. दिल्लीतील दहा जागेवर प्रदूषणाचा स्तर अधिक दिसून आला आहे. गेल्या २४ तासामध्ये पंजाब -हरियाणामध्ये पराली जाळण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रदूषणाचा स्तर जास्तच वाढला आहे. पुढच्या दोन दिवसाता दिल्लीमधील प्रदूषण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -