घरताज्या घडामोडीराजधानी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट! मुख्यमंत्री केजरीवालांनी केलं जाहीर!

राजधानी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट! मुख्यमंत्री केजरीवालांनी केलं जाहीर!

Subscribe

देशात कोरोनाचे रुग्ण अजूनही वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारकडून आणि विविध राज्य सरकारांकडून देखील स्थानिक पातळीवर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन अनलॉक केला जात आहे. मात्र, त्यातच एक गंभीर बाब समोर आली असून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. ‘दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचं दिसत आहे’, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सध्याच्या घडीला आरोग्य यंत्रणेवर ताण नसून सर्व आवश्यक बाबींचा पुरेसा पुरवठा सुरू असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

…म्हणून दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट!

अरविंद केजरीवाल यांनी आज जाहीर पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली घोषणा केली. ‘मला दिल्लीच्या जनतेला हे सांगायचं आहे की दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी आणि ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला रोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजारांच्याही खाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या सातत्याने वाढत आहे. मंगळवारी २४ तासांमध्ये दिल्लीमध्ये तब्बल ६ हजार ७२५ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत’, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ४ लाखांच्या पार गेला आहे.

- Advertisement -

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीतील खासगी रुग्णालयातले ८० टक्के आयसीयू बेड कोरोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यासंदर्भात प्रशासनाने दिलेल्या निर्णयावर स्थगिती आणली होती. त्याविरोधात दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं देखील अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. दिल्लीमध्ये ३३ खासगी रुग्णालयं असून त्यातले ८० टक्के आयसीयू बेड कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -