घरदेश-विदेशदिल्लीचे मुख्यमंत्री म्हणतात प्रदूषण घटले

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणतात प्रदूषण घटले

Subscribe

दिल्ली प्रदूषण कमी झाल्यामुळे आता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियमाची गरज नसल्याचे केजरीवाल म्हणतं आहे.

सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रदूषण कमी झाल्याचा दावा करत असून आता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियमाची गरज नाही असे म्हटले आहे. प्रदूषण वाढल्यामुळे दिल्ली सरकारने ४ ते १५ नोव्हेंबर पर्यंत हा वाहतूक नियम लागू केला होता. या नियमाच्या कालावधीत गरज पडल्यास वाढ करण्यात येणार असून या नियमाबाबत अंतिम निर्णय सोमवारी घेण्यात येईल असे देखील केजरीवाल यांनी सांगितले होते.

याच संदर्भात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस ते असे म्हणाले, ‘आता आभाळ स्वच्छ झाले आहे, त्यामुळे या नियमाची गरज नाही.’

- Advertisement -

या नियमानंतर दिल्ली प्रदूषणात थोडासा फरक पडला होता. मात्र पुन्हा प्रदूषणाची पातळी वाढली. सोमवारी सकाळी ९ वाजता दिल्लीत प्रदूषणाचे प्रमाण २०७ आहे. तर रविवारी सकाळी ९ वाजता ते २५४ इतके होते.

- Advertisement -

हेही वाचा – Video: धक्कादायक! व्हिडिओ शूटिंगच्या नादात मित्रालाच गमावले!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -