घरदेश-विदेशनिर्भयाच्या दोषींविरुद्ध तिसर्‍यांदा डेथ वॉरंट

निर्भयाच्या दोषींविरुद्ध तिसर्‍यांदा डेथ वॉरंट

Subscribe

३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी!

देशाला हादरवून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चौघा दोषींना येत्या 3 मार्चला सकाळी सहा वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने याबाबतचा निर्णय सोमवारी दिला आहे. निर्भयाच्या दोषींविरुद्ध नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे.

दोनवेळा फाशी टळली : अक्षय ठाकूर (31), पवन गुप्ता (25), मुकेश सिंह (32) आणि विनय शर्मा (26) या चार दोषींची फाशी दोन वेळा टळली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणाच्या 7 जानेवारीला झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने चार आरोपींविरोधात डेट वॉरंट जारी केले होते.

- Advertisement -

त्यानुसार या चौघांना 22 जानेवारीला फासावर लटकवले जाणार होते. मात्र दोषी असलेल्या मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिकेची मागणी केली होती. त्यामुळे तेव्हा फाशी टळली. मात्र राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.त्यानुसार 17 जानेवारीच्या सुनावणीदरम्यान चारही आरोपींविरोधात नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले. या डेथ वॉरंटनुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाच वेळी फाशी दिली जाईल, असा निर्णय दिल्ली कोर्टाने दिला होता. मात्र दोषी आरोपी विनय शर्माने फाशीला स्थगितीची मागणी करणारी याचिका पटियाला हाऊस कोर्टात केल्याने 1 फेब्रुवारीची फाशी टळली होती.

16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. दोषींपैकी एक अल्पवयीन असल्यामुळे त्याची सुटका झाली. तर एका दोषीने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -