घरताज्या घडामोडीअखेर निर्भयाच्या गुन्हेगारांना ३ मार्चला होणार फाशी

अखेर निर्भयाच्या गुन्हेगारांना ३ मार्चला होणार फाशी

Subscribe

दिल्ली निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना अखेर ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी होणार आहे. पुन्हा एकदा पटियाला न्यायालयाकडून नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार या नराधमांना ३ मार्चला फासावर लटकवणार आहेत. अजूनही दोषींकडे कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचं आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता खरचं या दिवशी फाशी होणार आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे. कारण यापूर्वी देखील अशाच प्रकारे डेथ वॉरंट जारी करण्यात आलं होत.

- Advertisement -

यावर निर्भयाची आई म्हणाली की, उशीरा जरी झाला असला तरी न्याय मिळाला. पटियाला न्यायाकडून डेथ वॉरंट मिळालं आहे. त्यामुळे ३ मार्च या नराधमांना फाशी मिळले अशी आशा आहे.

तसंच या विषयावर आरोपींचे वकील ए. पी. सिंह यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमच्याकडे अजूनही पर्याय आहेत. कोर्टाने प्रसारमाध्यमांचा आणि राजकारण्यांचा दबाव असल्याने डेथ वॉरंटची तारीख जारी केली आहे.

- Advertisement -

यापूर्वी निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी २२ जानेवारीचं डेथ वॉरंट करण्यात आलं होतं. मात्र ती तारीख पुढे ढकल्यात आली. त्यानंतर १ फेब्रुवारीला या चौघांना फाशी देण्याचं डेथ वॉरंट आलं होत. त्यावेळी देखील ही तारीख पुढे ढकलण्यात आली. मग यानंतर कोणताही निर्णय याबाबत आला नव्हता. आता तिसऱ्यांदा ही तारीख जारी करण्यात आली आहे.


हेही वाचा – ‘ट्रम्प स्वागताची लगीनघाई’, हे गुलामगिरी मानसिकतेचे लक्षण – सामना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -