घरदेश-विदेशपी. चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी; तुरुंगात सुविधा मिळणार!

पी. चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी; तुरुंगात सुविधा मिळणार!

Subscribe

ईडीची मागणी फेटाळून लावत दिल्ली न्यायालयाने आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी पी. चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना १४ दिवसांसाठी १३ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीय कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने दिला. दरम्यान आणखी एका दिवसाच्या चौकशीसाठी त्यांची आणखी एक दिवसाची कोठडी देण्याची ईडीने केलेली मागणी दिल्ली न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान तिहारच्या तुरुंगात पी. चिदंबरम यांना सुविधा पुरवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

तुरुंगात सुविधा पुरवण्याचे आदेश

ईडीची मागणी फेटाळून लावतानाच न्यायालयाने पी. चिदंबरम यांना तिहार जेलमध्ये सुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पाश्चिमात्य पद्धतीचे शौचालय, वैद्यकीय सुविधा, औषधं, सुरक्षा आणि स्वतंत्र कक्ष त्याचप्रमाणे तुरुंगात पी. चिदंबरम यांना घरचे जेवण देण्याची मुभा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान कोर्टरुममध्ये पी. चिदंबरम यांचा फोटो घेणाऱ्या एका वकीलाला न्यायालयाने खडे बोल सुनावले. एवढेच नाही तर याप्रकरणी त्याला माफी मागण्याचे न्यायालयाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -