घरदेश-विदेशदिल्लीच्या रस्त्यावर लवकरच १००० इलेक्ट्रिक बस धावणार

दिल्लीच्या रस्त्यावर लवकरच १००० इलेक्ट्रिक बस धावणार

Subscribe

दिल्लीतील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकार १००० इलेक्ट्रिक बसची खरेदी करणार आहे. या प्रस्तावाला कॅबिनेटने मंजूरी दिली आहे.

दिल्ली सरकारने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी कॅबिनेटने १००० इलेक्ट्रिक बसला खरेदी करण्याच्या प्रस्तानवाला मंजूरी दिली आहे. एका वर्षामध्ये या सर्व इलेक्ट्रीक बस रस्त्यावर धावतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

इलेक्ट्रिक बस प्रस्तावाला कॅबिनेटची मंजूरी

दिल्लीचे परिवहन मंत्री कैलास गहलोत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रदूषणरहित १००० इलेक्ट्रिक बस खरेदीला सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. यासाठी सल्लागाराची नेमणुक करण्यात आली आहे. हे सल्लागार तीन महिन्यात सरकारला यासंदर्भातला रिपोर्ट देतील. एका वर्षाच्या आत या सर्व इलेक्ट्रिक बस रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला जाईल. या बसेस लो फ्लोर आणि वातानुकुलित असणार आहेत.

- Advertisement -

लवकरच इलेक्ट्रिक बसेस दिल्लीत धावणार

आतापर्यंत जगातील कोणत्याही देशामध्ये ऐवढ्या मोठ्या संख्येने एकाच वेळी इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावल्या नसतील. ज्यापध्दतीने दिल्लीतील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आधी सीएनजीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे या इलेक्ट्रिक बसेस दिल्लीतील प्रदूषणाला रोकण्यासाठी मैलाचा दगड ठरतील. येत्या काही दिवसामध्ये दिल्लीतील संपर्ण वाहतूक व्यवस्था ई-ट्रान्सपोर्ट बनेल, अशी आशा गहलोत यांनी व्यक्त केली आहे.

इलेक्ट्रिक बससाठी नविन डेपो

इलेक्ट्रिक बससाठी परिवहन विभाग सहा नविन डेपो बनवणार आहेत. हे विनोद नगर, बवाना सेक्टर-५, रोहिणी सेक्टर- ३७, रेवला खानपूर आणि नरेला येथे बनवण्यात येणार आहे. बसच्या चार्जिंग पॉईंट या सर्वाची जबाबदारी कत्राटदारांची असणार आहे. या डेपोमध्ये इतर मुलभूत सुविधांचा विकास केला जाणार असल्याचे गहलोत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -