घरदेश-विदेशबाल मजूरांना कामाला ठेवल्याबद्दल कोर्टाने सुनावली अजब शिक्षा

बाल मजूरांना कामाला ठेवल्याबद्दल कोर्टाने सुनावली अजब शिक्षा

Subscribe

बालकामगाराला कामावर ठेवलं म्हणून शंभर झाडे लावण्याची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने एका दाम्पत्याला दिली आहे.

घरगुती कामांसाठी बालकामगार ठेवणं एका दाम्पत्याला चांगलच महागात पडलं आहे. या दामंपत्याला दिल्ली उच्च न्यायालायाने दीड लाखाचा दंड आकारला आहे. त्यासोबतच शंभर झाडे लावण्याची शिक्षादेखील दिली आहे. न्यायमुर्ती नज्मी वाझीरी यांनी ही शिक्षा सुनावली आहे. यासोबतच बालकामगारांची दलाली करणाऱ्या दोन दलालांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड आकारला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलगा दोषी ठरलेल्या दाम्पत्याच्या घरी झाडांना पाणी घालणं आणि त्यांची काळजी घेणे, हे काम करत होता. यासंदर्भात दिल्लीच्या राजौरी गार्डन पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती.

दंडाची रक्कम अल्पवयीन कामगाराला मिळणार

दिल्ली उच्च न्यायालयाने दाम्पत्याला प्रत्येकी ५० झाडे लावण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी न्यायालयाने वनसंरक्षण अधिकाऱ्याला रोपे देण्याचे निर्देश दिले आहेत. रोपट्यांची लागन करुन दाम्पत्याने ती सहा फूट उंचीची करावी, अशी शिक्षा न्यायालयाने दिली आहे. यासोबतच दंड आकारण्यात आलेली दीड लाख रुपये रक्कम अल्पवयीन कामगाराला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

- Advertisement -

वेगवेगळ्या प्रजातीचे झाडे लावण्याचे आदेश

शंभर झाडांमध्ये विविध प्रकारच्या प्रजातीचे झाडे असावीत, असा निर्देशही दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर हे झाडे सहा फूट उंचीचे असावीत. त्याचबरोबर या झाडांसाठी पोषक अशा मातीचा वापर केला जावा, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर वन संरक्षण उपअधिकाऱ्याने वृक्षारोपणसाठी (क्लस्टर अंजीर), कदंब (बफ्लाउव्हर ट्री), पिलखान (पांढरा अंजीर), जामुन (ब्लॅक प्लम), बरगड (बरगडी वृक्ष), आंबा, अमाल्टस (गोल्डन शॉवर), महाआ (बटर ट्री), पुतृंजिव, बध, सगवान (टीक वुड), सफेड सिरीस (अल्बिजिया प्रोसेरा), काला सिरीस, अंजीर, कथल (जॅकफ्रूट), पलाश, अर्नी, बिस्टेंदू, रोहिदा आणि मेदशींगी या झाडांची रोपे द्यावी, असा निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.


हेही वाचा –माणसाला जनावराची वागणूक, न्यायालयाची सरकारला नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -