JNU Violence: दिल्ली हायकोर्टाची फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसह गुगललाही नोटीस

जेएनयू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाने पोलीस, फेसबुक, व्हॉट्सAPP आणि गुगलला नोटीस पाठवली आहे.

Delhi High Court
केंद्र सरकारची दिल्ली हायकोर्टात भूमिका

जेएनयू प्रशासनाने घेतलेल्या शुल्क वाढीविरोधात विद्यार्थ्यांनी ५ जानेवारी रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाने फेसबुक, व्हॉट्सAPP आणि गुगलला नोटीस पाठवली आहे. जेएनयूतील तीन प्राध्यापकांनी हिंसाचारावेळचे सीसीटीव्ही फुटेज, व्हॉट्सAPP संदेश आणि इतर पुरावे जतन करण्यात, यावेत या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने ही नोटीस पाठवली असून मंगळवारपर्यंत यावर उत्तर मागवले आहे.

नेमके काय घडले?

दरम्यान, आज यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी दिल्ली पोलिसांनी हायकोर्टाला सांगितले की, जेएनयू प्रशासनाने घेतलेल्या शुल्क वाढीविरोधात विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्या हिंसाचाराचे फुटेज संरक्षित ठेवण्यास आणि ते पोलिसांकडे सोपवण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप जेएनयू प्रशासनाकडून कुठलेही उत्तर आलेले नाही. त्याबरोबर दिल्ली पोलिसांकडून व्हॉट्सAPP लिखित विनंती करुन त्या दोन व्हॉट्सAPP ग्रुपवरील डेटा सुरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच ज्या ग्रुपवर जेएनयूतील हिंसाचाराचा कट रचण्यात आला होता.


हेही वाचा – JNU Violence : हल्ला करणाऱ्यांमधील ‘ती’ तरुणी अभाविपची सदस्य