घरदेश-विदेश'या' शुल्लक कारणावरुन गमवावा लागला जीव

‘या’ शुल्लक कारणावरुन गमवावा लागला जीव

Subscribe

कुत्र्याशी माफी न मागीतल्याने दिल्लीत एका इसमाला आपला जीव गमवावा लागला. मद्याच्या नशेत खून केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

कुत्र्याला टेम्पोचा धक्का लागल्यामुळे त्या कुत्र्याची माफी न मागितल्याने एका चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना दिल्लीतील उत्तमनगर परिसरात घडली असून पोलिसांनी या प्रकरणा दोघांना अटक केली आहे. शुल्लक कारणावरुन झालेल्या बाचाबाचीमुळे एका टेम्पो चालकाला बेदम मारहाण करुन त्यावर धारधार चाकूचा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात या टेम्पो चालकाला आपला जीव गमवावा लागला. कुत्र्याला धक्का देऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाला पकडून त्याने कुत्र्याची माफी मागावी असा आग्रह करण्यात आला होता. मात्र चालकाने तसे न केल्यामुळे माथेफिरू तरुणांनी ट्रक चालकाची हत्या केली. विजेंद्र राणा असे या टेम्पो चालकाचे नाव असून तो याच परिसरात राहात होता. दरम्यान दिल्ली पोलिसांनी घटने विरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील कारवाई सुरु केली आहे.

कशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित आणि पारस हे दोन तरुण आपल्या कुत्र्याला फिरवत होते. त्यावेळी चालक विजेंद्र राणा यांचा ट्रक त्या ठिकाणी आला. वळणावर राणा यांच्या ट्रकने कुत्र्याला धडक दिली. त्यावेळी अंकित आणि पारसने राणाशी वाद घातला व कुत्र्याशी माफी मागण्यास सांगितले. मात्र राणाने माफी न मागितल्यामुळे या दोघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत राणावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. यानंतर लोकांनी मध्यस्थी करुन त्यांना आवरले. राणा यांना जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात नेण्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

“या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये अंकित आणि पारस दोन्ही भाऊ आहेत. हल्ला केला त्यावेळी अंकित आणि परस हे मद्याच्या नशेत आढळले”- उप आयुक्त संजीव शर्मा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -