घरदेश-विदेशनववर्षाचे स्वागत महागात; पित्याच्या हातून मुलाची हत्या

नववर्षाचे स्वागत महागात; पित्याच्या हातून मुलाची हत्या

Subscribe

आठ वर्षाच्या रेहानच्या गालाला गोळी लागली होती. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

दिल्लीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नववर्षाच्या स्वागतावेळी वडिलांनी हवेत केलेल्या गोळीबारात मुलाचाच मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीतील न्यू उस्मानपूर भागामध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी याबद्दल माहिती देताना असे सांगितले आहे की, आरोपीची ओळख यासीन अशी आहे. जदयूचे मादी आमदार राजू सिंह यांनी नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला फतेहपूर येथील एका फार्म हाऊसमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टी दरम्यान हवेत केलेल्या गोळीबारत एका महिलेच्या मृत्यूनंतर ही घटना समोर आली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये खळबळ उडाली आहे.

नववर्षाच्या पार्टीतील घटना

३१ डिसेंबरला न्यू उस्मानपूर पोलिसांना एका व्यक्तिला गोळी लागल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता. आठ वर्षाच्या रेहानच्या गालाला गोळी लागली होती. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीस तपासा दरम्यान, गोळी मृत रेहानचे वडील यासीनने चालवली असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

आरोपी पित्याला अटक

याप्रकरणी शनिवारी पोलिसांनी यासीनला अटक केली. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला असून त्याने सांगितले की, उत्तर प्रदेशमधील लोनीच्या रवि कश्यप (२१ वर्ष) याच्याकडून बंदूक खरेदी केली होती. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत करत असताना आरोपी यासीनने हवेत गोळीबार केला. मात्र या गोळीबारात त्याचाच ८ वर्षाचा मुलगा रेहानला गोळई लागली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून बंदुक देखील जप्त केली आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

पुण्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -