PUBG च्या नादात १५ वर्षांच्या नातवाने आजोबांच्या खात्यातून लंपास केले २ लाख

पेटीएम वरून Google Play कडून PUBG साठी अनेक पेमेंट केल्याचे झाले उघड

केंद्र सरकारने मोबाईल गेम पब्जीवर बंदी घातली आहे. अलीकडेच बंदी घातलेल्या पब्जीच्या आहारी गेलेल्या दिल्लीत राहणाऱ्या एका १५ वर्षाच्या मुलाने आपल्या आजोबांच्या खात्यातून २ लाखाहून अधिक रुपये ट्रान्सफर करून पब्जीसाठी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.

बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झालेल्या आजोबांच्या मोबाइलवर खात्यातून २५०० रुपये डेबिट झाल्याचा मॅसेज आला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. खात्यात फक्त २७५ रुपयांचा मेसेज पाहून पेन्शनधारक आजोबा हैरान झाले. पीडित व्यक्तीने माहिती घेतली तेव्हा दोन महिन्यांत पेटीएमच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून २ लाख ३४ हजार रुपयांहून अधिक रुपये डेबिट झाल्याचे समजले. याबाबत पीडित आजोबांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीमध्ये त्यांनी असा आरोप केला आहे की, पैसे ट्रान्सफर होण्यासंदर्भात त्यांच्या फोनवर कोणताही ओटीपी पाठविला गेला नाही. जेव्हा दिल्ली पोलिसांनी तपास केला आणि पेटीएम आयडीधारकाला पकडले. पेटीएम आयडी आजोबांच्या नातू पंकज कुमारच्या नावावर असून त्याचे केवायसीदेखील केले होते.

दरम्यान, पंकजने सांगितले की त्याच्या अल्पवयीन मित्राने त्याच्याकडे पेटीएम आयडी आणि पासवर्ड विचारला आहे. त्यावेळी त्याने असे सांगितले होते की त्याचा पेटीएम आयडीची केवायसी झालेले नाही. पंकजच्या पेटीएम वरून Google Play कडून PUBG साठी अनेक पेमेंट करण्यात आले होते. जेव्हा तपास करण्यात आला तेव्हा हे उघड झाले की, हे कारस्थान आजोबांच्या नातवाने केले आहे.

कारस्थान करून अडकलेल्या नातवाची सायबर सेलने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हेही त्यांनी सांगितले की, पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तो ओटीपीचा मॅसेज डिलीट करायचा, जेणेकरून कोणाला पैसे काढल्याची माहिती मिळू नये आणि बँक खाते हॅक झाल्याचा प्रकार वाटावा.


आता Corona Test करायची असेल तर आधार कार्ड असणार आवश्यक