घरताज्या घडामोडीदिल्ली हिंसाचार: दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

दिल्ली हिंसाचार: दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

Subscribe

दिल्लीतील परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

दिल्लीमध्ये सीएए कायद्यावरुन हिंसाचार उफाळलेल्या हिंसाचारामुळे दिल्लीतील परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. ठिकठिकाणी हिंसाचाराच्या आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी लागू केली असतानाच आता जाळपोळ करणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्लीमधील हिंसाचारात एका पोलीस कॉन्स्टेबलसह १३ जण ठार झालेत. या हिंसाचारात ५६ पोलिस आणि १३० नागरिक जखमी झालेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. दिल्लीत सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीआरपीएफ, आरएएफ आणि एसएसबीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी सतत गस्त घालत आहेत. आजही काही भागात हिंसक घटना घडल्याचे रंधवा म्हणाले.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत लष्कराला पाचरण करण्याची मागणी करण्यात आली होती. पण गृहमंत्रालयाने याला नकार दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.


हेही वाचा – दिल्ली हिंसाचार : भाजपच्या या नेत्याचं हिंसाचाराशी कनेक्शन?

ड्रोनद्वारे केली जातेय परिसराची टेहाळणी

तणावग्रस्त भागात ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात येत आहे. तसेच हिंसाचार झालेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. दिल्लीतील वातावरण दुषीत करणाऱ्या समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हिंसेच्या घटनेनंतर भजनपुर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर खजुरीखासमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -