दिल्लीत दहशवाद्यांचा मोठा कट उधळण्यात यश

दिल्लीत दहशवाद्यांचा मोठा कट उधळण्यात यश

दिल्ली हादरवून टाकण्याचा दहशवाद्यांचा मोठा कट उधळण्यात यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने कारवाई केली असून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, हे दोन दहशतवादी दिल्ली मोठा कट करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांच्या सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याचा कट रचला जात होता.

या दोन्ही दहशवाद्यांविषयी दिल्ली पोलिसांकडे माहिती होती, असे सांगण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी या दोन्ही दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. सोमवारी रात्री १०.१५ वाजता सरायकाले खां येथील मिलिनियम पार्क जवळ जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना पकडले गेले. या दहशतवाद्यांकडून शस्त्रेही जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशवाद्यांची ओळख पटली आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे अब्दुल लतीफ आणि कुपावाडा जिल्ह्यातील हट मुल्ला गावात राहणार अशरफ खाताना अशी ओळख या दोन दहशवाद्यांची पटली आहे. पोलिसांनी यांच्याकडून दोन सेमीची ऑटोमॅटिक पिस्तूल आणि १० काडतुसे जप्त केली आहे.


हेही वाचा – भारत बायोटेकची कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात