मुंबईतील कोरोना नियंत्रणात, दिल्लीत मात्र कहर सुरुच!

एकीकडे दिल्लीत दिवसाला ७ हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे तर दुसरीकडे मुंबईत मात्र कोरोना हीच संख्या एक हजारपेक्षा कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसतंय.

राजधानी दिल्ली आता कोरानाची राजधानी बनताना दिसतेय. ज्या मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाचं थैमान होतं, तिथे मात्र कोरोनाचा वेग मंदावत असून बाधितांचा आकडा नियंत्रणात आला आहे. परंतु दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर अद्याप सुरूच आहे. एकीकडे दिल्लीत दिवसाला ७ हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे तर दुसरीकडे मुंबईत मात्र कोरोना हीच संख्या एक हजारपेक्षा कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसतंय. ज्या मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक होता तिथे आता परिस्थिती हळू हळू सुधारत असल्याने ही दिलासादायक बाब म्हणता येईल, तर दुसरीकडे दिल्लीत मात्र कोरोनाचा विळखा अधिक वाढताना दिसतोय.

धक्कादायक म्हणजे गेल्या २४ तासात दिल्लीत ७ हजार १७४ नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आजवर संपूर्ण देशात २४ तासात वाढलेली हा सर्वात मोठा आकडा असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच केरळमध्ये ७ हजार दोन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दिल्लीने त्याच्या पुढेही मजल मारल्याने काल या वाढीने नवा विक्रमच नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात कोरोनावर प्रभावी नियंत्रण केलं म्हणून दिल्ली मॉडेलची चर्चा सुरु होती. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. ज्या दिल्लीत मागच्या दहा दिवसांपर्यंत दिवसाला दोन-अडीच हजार पेशंट सापडत होते, तो आकडा वेगाने दुप्पट तिप्पट होऊ लागला आहे. दिल्लीत कोरोना बाधितांचा एकूण आकडा ४ लाख २३ हजार इतका तर आहे. तर आजवर ६ हजार ८३३ कोरोना बळी ठरले आहेत. गेल्या २४ तासात दिल्लीत ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्य झाला. आजवर देशात २४ तासात झालेल्या कोरोना बळींच्या क्रमवारीत हा आकडा दुसऱ्या क्रमांकावर आहे.


CoronaVirus: देशात २४ तासांत ५३ ,९२० जणांनी केली कोरोनावर मात