म्हणून ‘त्याने’ भाजप नेत्यावर भिरकावली चप्पल

दिल्लीत पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर एकाने चप्पर भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mumbai
भाजप नेत्यावर चप्पल फेकली

दिल्लीत पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर एकाने चप्पर भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नेते आणि खासदार जीव्हीएल नरसिंहराव भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर चप्पल भिरकावणाऱ्या व्यक्तीला पकडून बाहेर नेण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज, १८ एप्रिल रोजी होत आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांच्यावर भिरकावलेली चप्पल त्यांच्या चेहऱ्याला घासून बाजूला पडली. त्यानंतर चप्पल भिरकावणाऱ्याला पकडण्यात आले. शक्ती भार्गव असे आपले नाव असून पेशाने डॉक्टर असल्याचे चप्पल भिरकावणाऱ्याने सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

या कारणामुळे भिरकावली चप्पल 

चप्पल भिरकावलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांला आयपी स्टेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली असून त्यातून या घटनेचे कारण समोर आले. चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीचे नाव शक्ती भार्गव असे असून ते कानपूर येथे राहणारे आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने भार्गव हॉस्पिटलदेखील आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कुटुंबात वाद सुरु होते. शक्ती भार्गव यांना कुटुंबियांनी सर्व प्रॉपर्टी न देण्याचा निर्णय घेतला. एका प्लॉट संदर्भात शक्ती भार्गव हे मानसिक तणावात होते. या तणावाखाली त्यांनी हे कृत्य केल्याचे समजते.