घरट्रेंडिंगविषारी यमुनेत केली छट पूजा; फोटो व्हायरल

विषारी यमुनेत केली छट पूजा; फोटो व्हायरल

Subscribe

दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर यमुना नदीच्या पात्रामध्ये दोन फूट विषारी रयायनाचा फेस तयार झाला आहे. याचदरम्यान सुरू असलेल्या छटपूजेसाठी भाविकांना याच फेसामध्ये उभं राहून पूजा करावी लागल्याचं दृश्य यमुना नदीवर पाहायला मिळालं!

कालपासून इंटरनेटवर काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये महिला हातात पूजेची थाळी घेऊन ढगात उभ्या असल्यासारख्या दिसत आहेत. सर्वत्र सफेद ढग आणि त्यात या महिला! पूर्वीच्या महाभारत मालिकेमध्ये देवलोकातील मंडळी जशी ढगातून प्रकट व्हायची, तशाच प्रकारे या महिला देखील थेट ढगातूनच प्रकट होऊन पूजा करत आहेत असंच वाटतंय. पण फोटोंमध्ये दिसत असलेले ढग हे ढग नसून तो आहे विषारी रसायनाचा फेस. आणि जिथे या महिला उभ्या आहेत, ती आहे तमाम भारतीयांसाठी पवित्र असं स्थान असलेली यमुना नदी! दिल्लीतील प्रदूषणाचे प्रमाण फारच वाढलेले आहे. ही प्रदूषणाची समस्या फक्त हवेपर्यंत मर्यादित नसून पाण्यावर देखील याचा परिणाम झालेला आहे.

दिल्लीतील यमुना नदीवर प्रदूषणामुळे सफेद रंगाचा फेस तयार झाला आहे. गेल्या ३-४ दिवसांत दिल्लीत छट पूजा साजरा करण्यात आली. भाविकांनी चक्क या फेसाळलेल्या पाण्यात उतरून पूजा केली. रविवारच्या दिवशी हजारो भक्तांनी यमुना नदीच्या काठावर उभं राहून प्रार्थना करत छट पूजेचा अखेरचा दिवस साजरा केला. पण यावेळी अनेक जणांना प्रदूषणामुळे नदीत झालेल्या विषारी फेसात उभ राहून ही पूजा करावी लागली. याशिवाय भाविकांना उगवत्या सूर्याचं दृश्य काही पाहता आलं नाही. पायाखाली विषारी रसायनाचा फेस असतानाच दिल्लीच्या हवेत देखील धूर आणि धुक्यामुळे दृष्यमानता (Visibility) कमी झाली आहे.

- Advertisement -

दिल्लीतीत वाढत्या प्रदूषणावरून थेट सर्वोच्च न्यायालयाने देखील दिल्लीसह हरयाणा सरकारला फटकारलं आहे. दिल्ली सरकारने प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी दिल्लीत सुरू केलेल्या ऑड-इव्हन ट्रॅफिक योजनेवर टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने नक्की या योजनेचा प्रदूषणाची पातळी कमी होण्यात काय फायदा आहे? असा सवाल देखील विचारला आहे.

- Advertisement -

गुडघ्यापर्यंत असलेल्या या विषारी फेसात उभं राहून महिलांनी केलेल्या पूजेचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Husband and wife doing the rituals of Chhath Puja
छट पुजेची विधी करताना पती पत्नी
Women praying for the Puja
फेसात उभं राहून पूजेसाठी प्रार्थना करताना महिला!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -