घरदेश-विदेशमार्केट सचिवांना मारहाण केल्याप्रकरणी सोनाली फोगट यांच्या अटकेची मागणी

मार्केट सचिवांना मारहाण केल्याप्रकरणी सोनाली फोगट यांच्या अटकेची मागणी

Subscribe

हरियाणाच्या हिसार कृषी बाजारात त्यांनी बाजार समितीचे सचिव सुलतान सिंग यांना थप्पड मारली, तसंच चपलेने मारहाण केल्या प्रकरणी भाजप नेत्या सोनाली फोगट यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोनाली फोगट पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. हरियाणाच्या हिसार कृषी बाजारात त्यांनी बाजार समितीचे सचिव सुलतान सिंग यांना थप्पड मारली, तसंच चपलेने मारहाण केली. याप्रकरणी सोनाली फोगट यांना अटक करावी अशी कर्मचार्‍यांनी मागणी केली आहे. सोनाली फोगट यांना तत्काळ अटक करा अशी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांची मागणी आहे. सोनाली फोगट यांच्या अटकेसाठी ते हिसारमध्ये ठाण मांडून बसले आहेत. बाजार विभागातील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवत आहेत. तर हरियाणाचे सर्व बाजार अधिकारी व कर्मचारी सोनाली फोगट यांचा निषेध करण्यासाठी हिसारमध्ये कूच करत आहेत.

सोनाली फोगट यांनी बाजार समितीचे सचिव सुलतान सिंग यांना हिसारच्या बालसमंद येथील कृषी बाजारात थप्पड आणि चप्पलने मारहाण केली होती. सोनाली फोगट यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा वाद वाढल्यानंतर सोनाली फोगट यांनी आडमपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंडईत गेल्याचं म्हटलं आहे. तेथे त्यांनी बाजार समितीच्या सचिवांना बाजारात बोलवून अन्नधान्याच्या विक्रीत शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणींची सर्व माहिती दिली.

- Advertisement -

हेही वाचा – मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज


सोनाली फोगटविरोधात गुन्हा दाखल

बाजार समितीचे सचिव सुलतान सिंग यांच्या तक्रारीवरून सोनाली फोगट यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १४७, १४९, ३३२, ३५३, १८६ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली फोगट यांच्या तक्रारीवरून सुलतान सिंगविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ आणि ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात सोनाली फोगट यांना अटक करावी अशी मागणी कर्मचारी करत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -