घरदेश-विदेशराज्यघटनेतून इंडिया शब्द काढून टाकण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुणावणी

राज्यघटनेतून इंडिया शब्द काढून टाकण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुणावणी

Subscribe

इंडिया हा शब्द काढून टाकावा आणि भारत किंवा हिंदुस्थान असं ठेवावं, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

राज्यघटनेतून इंडिया शब्द काढून केवळ भारत हेच नाव ठेवावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेची सुनावणी होणार आहे. इंडिया हा शब्द गुलामगिरीचे लक्षण आहे आणि म्हणून त्याऐवजी भारत किंवा हिंदुस्थान वापरावं, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केल आहे. घटनेतील कलम १ मध्ये सुधारणा करून इंडिया हा शब्द हटवावा, असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. कलम १ मध्ये म्हटलं आहे की इंडिया म्हणजे भारत. त्याऐवजी इंडिया हा शब्द काढून टाकावा आणि भारत किंवा हिंदुस्थान असं ठेवावं. देशाला केवळ त्याच्या मूळ आणि खऱ्या नावावरून ओळख दिली पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये असं म्हटलं आहे की इंग्रजी नाव हटवणं हे प्रतीकात्मक असेल, परंतु ते आमच्या राष्ट्रीयत्वाबद्दल, विशेषत: भविष्यातील पिढीसाठी अभिमानाचं लक्षण असेल. वास्तविक, इंडिया या शब्दाच्या जागी भारत ठेवल्यास स्वातंत्र्यलढ्यात आपल्या पूर्वजांच्या संघर्षाला न्याय दिल्यासारख होईल.

- Advertisement -

हेही वाचा – भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या १३ दहशतवाद्यांना कंठस्नान


उमा भारतींनी उठवला सवाल

या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या उमा भारती यांनी दोन दिवसांपूर्वी एकामागून एक सात ट्विट केले. उमा भारती म्हणाल्या, ‘सूर्यप्रकाश दॅट इज सनलाइट’ अशी एका देशाचे किंवा एका व्यक्तिचे दोन नावं नसतात. अशाच प्रकारे इंडिया दॅट इज भारत’ कोणाचंही नाव असणं हास्यास्पद आहे. पुढे उमा भारती म्हणाल्या, “कदाचित भारत माता नरेंद्र मोदी जी पंतप्रधान होण्याची वाट पाहत होती, आता तिच्या कपाळावर डाग पुसून टाकूया.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -