घरदेश-विदेशहोय, नोटबंदी फसली - ओ. पी. रावत

होय, नोटबंदी फसली – ओ. पी. रावत

Subscribe

केंद्र सरकारनं केलेल्या नोटाबंदीचा उद्देश फसला असल्याची टिका मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून पाय उतार होणाऱ्या ओ. पी. रावत यांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून पाय उतार होताच त्यांनी ही टिका केली आहे.

केंद्र सरकारनं केलेल्या नोटबंदीचा उद्देश फसला असल्याची टिका मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून पाय उतार होणाऱ्या ओ. पी. रावत यांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून पाय उतार होताच त्यांनी ही टिका केली आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. तसंच निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगानं मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त केल्याचं देखील ओ. पी. रावत यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ओ. पी, रावत यांनी सांगितले की, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तब्बल २०० कोटी रूपये जप्त करण्यात आले आहेत. हा जप्त केलेला पैसा प्रभावी लोकांकडून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयांचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही हे स्पष्ट होतं असं देखील रावत यांनी यावेळी सांगितलं.

वाचा – ‘मान्य, नोटबंदी गरीब शेतकऱ्यांना भोवली’

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीला २ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नोटबंदी सफल झाल्याचा दावा केला होता. पण, ओ. पी. रावत यांनी मात्र नोटबंदी फसल्याचं म्हणत नरेंद्र मोदींच्या दाव्यातील हवा काढून टाकली आहे. नोव्हेंबर २०१६ साली नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून बाद होत असल्याची घोषणा केली होती. काळा पैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी नोटबंदी करत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा करताना केला होता. पण, प्रत्यक्षात मात्र नोटबंदीचा काहीही फायदा झालेला नाही असं ओ. पी. रावत यांनी म्हटलं आहे. शिवाय, यापूर्वी अनेकांनी नोटबंदी फसल्याचा म्हटलं आहे. पण, सरकारकडून मात्र नोटबंदी सफल झाली असा दावा केला जात आहे.

वाचा – नोटबंदीची अंमलबजावणी चूक – रजनीकांत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -