घरCORONA UPDATEआता कोरोनापासून रक्षण करण्यासाठी वापरा 'हा' खास डिओडरंट!

आता कोरोनापासून रक्षण करण्यासाठी वापरा ‘हा’ खास डिओडरंट!

Subscribe

कोरोनाव्हायरसला दूर ठेवण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याबरोबर हा डिओडरंट रक्षण करायला सज्ज झाला आहे.

अनेकांना डिओडरंट, परफ्यूम वापरण्याची सवय असते. कारण घराबाहेर पडल्यावर शरीराला घाम येऊन दुर्गंधी येऊ नये यासाठी डिओडरंट हमखास वापरला जातो. पण याच डिओडरंटचा वापर कोरोनाला मानवी शरीरापासून दूर ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे. लवकरच हा डिओडरंट बाजारात उपलब्ध होईल.

आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी आणि गुवाहाटीच्या प्राध्यापकांनी या दोघांनी मिळून डिओडोरंट कम सॅनिटायझर तयार केला आहे. ज्यामुळे कोरोनाही दूर राहील आणि दुर्गंधीही. कानपूरमधील फ्रँग्रॅन्स अँड फ्लेव्हर डेव्हलमेंट सेंटरमध्ये या डिओवर काम केलं. या डिओडरंटमध्ये ८० टक्के इथेल अल्कोहोल, १० टक्के ग्रीन ऑईल आणि १० टक्के मॉईश्चराइझर न्यूट्रोजेना ऑईल आहे.

- Advertisement -

या विषयी बोलताना माजी विद्यार्थी अंशिक गंगवारने सांगितले की, हा डिओडडरंट कम सॅनिटायझर आहे. हा डिओ शरीर आणि कपडे दोघांवरही वापरता येऊ शकतो. यामध्ये सॅनिटायझर घटक आहेत. जो कोरोनाला दूर ठेवेल. शिवाय ७ ते १० तास तुमच्या शरीरालाही ताजंतवानं वाटेल शिवाय या डिओचा त्वचा आणि पर्यावरणावर काहीही दुष्परिणाम होणार आहे. त्वचा आणि पर्यावरणासाठी सुरक्षित असा हा डिओ आहे. ”

त्यामुळे नागरिकांचे कोरोनाव्हायरसला दूर ठेवण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याबरोबर हा डिओडरंट रक्षण करायला सज्ज झाला आहे. त्याचबरोबर घराबाहेर असताना सॅनिटायझर वापरा. बाहेरून कोणतीही वस्तू घरात आणल्यानंतर ती नीट सॅनिटाइझ करून घ्या. फळं-भाज्या गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्या आणि घरातही स्वच्छता राखा. अशी छोटी छोटी काळजी आणि खबरदारी घेऊन आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो.

- Advertisement -

हे ही वाचा – …तोपर्यंत तबलिगींना भारत सोडता येणार नाही!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -