घरदेश-विदेशआधार क्रमांक लीक; तरीही बँकेतील पैसे सुरक्षित

आधार क्रमांक लीक; तरीही बँकेतील पैसे सुरक्षित

Subscribe

आधार कार्डच्या झेरॉक्स प्रतीचा गैरवापर होऊ शकत नाही. ही प्रत कोणाला सापडली तरी काळजीचे काहीच कारण नाही. कारण तुमच्या त्या प्रतीवरुन इतर कोणालाही बँकेचे खाते सुरु करता येणार नाही.

आधार क्रमांकावरुन तुमची कोणतीही माहिती कळू शकत नाही यावरुन सोशल मीडियावर ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा आणि हॅकर यांच्यात ट्विटवॉर झाले. त्यानंतर आधारच्या सुरक्षेचा प्रश्न  पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. पण आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने एक दिलासादायक माहिती दिली आहे. तुमचा आधार क्रमांक लीक झाला तरी तुमच्या बँकेतील पैशाला कोणीच धक्का पोहचवू शकणार नाही. पण असे असले तरी तुमचा आधार क्रमांक कोणत्याही सोशल साईटवर विनाकारण टाकू नका असे देखील युआयडीएआयने सांगितले आहे.

वाचा- परदेशात बसून ‘आधार’ केले हॅक

बँकेचे अकाऊंट सुरक्षित

आधारची सक्ती आता सगळीकडेच करण्यात आली आहे. बँका,शाळा, लाईट बिल, टेलिफोन बिल अशा सगळ्याच ठिकाणी ही सक्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून आधारची सुरक्षा धोक्यात आहे, अशी काहीशी चिन्हे होती. आधार बँकाशी लिंक केल्याने हा क्रमांक लीक झाल्यास त्याचा धोका बँकामधील मेहनतीने जमलेल्या पैशांना होऊ शकतो, अशी भिती अनेकांना होती. पण आता घाबरायचे काहीच कारण नाही. कारण आधारक्रमांरावरुन तुमच्या बँकेतील पैशांवर कोणीच डल्ला मारु शकणार नाही. कारण जरी एखाद्याने तुमचा आधार क्रमांकाचा गैरवापर करायचा प्रयत्न केला तरी क्युआर कोडसाठी फिंगरप्रिंटची आवश्यकता असते. त्याशिवाय तुमची कोणतीही खासगी माहिती किंवा पैशाला धोका नाही, असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

झेरॉक्सच्या प्रतीवरुन गैरवापर अशक्य

आधार कार्डच्या झेरॉक्स प्रतीचा गैरवापर होऊ शकत नाही. ही प्रत कोणाला सापडली तरी काळजीचे काहीच कारण नाही. कारण तुमच्या त्या प्रतीवरुन इतर कोणालाही बँकेचे खाते सुरु करता येणार नाही. बँकेत अकाऊंट सुरु करण्यासाठी बायोमॅट्रिक आणि ओटिपी यांची मदत घेतली जाते. शिवाय बँकेतून ऑनलाईन पैसे काढण्यासाठी ओटीपी क्रमांक देखील प्रत्येकवेळी मोबाईल क्रमांकावर पाठवला जातो. बँकांमध्ये खाते उघडताना बायोमेट्रिक पद्धतीने खातेधारकाची माहिती नोंदवली जाते, तसे जर बँका करत नसतील तर आधारवरुन होणाऱ्या नुकसानासाठी बँका जबाबदार असतील, असे देखील भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -