Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी डिप्रेशन, तणावामुळे कोरोना लसीचा प्रभाव होऊ शकतो कमी - वैज्ञानिकांचा दावा

डिप्रेशन, तणावामुळे कोरोना लसीचा प्रभाव होऊ शकतो कमी – वैज्ञानिकांचा दावा

Related Story

- Advertisement -

कोरोना नियंत्रणासाठी जगभरात कोरोना लसीवर युद्ध पातळीवर काम सुरू आहे. काही देशांमध्ये कोरोना लसीच्या मोहीमेला सुरुवात झाली आहे. भारतात देखील १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात होणार आहे. यादरम्यान कोरोना लस आणि लसीचा प्रभावासंदर्भात जगभरातील वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. त्यामुळे एका वैज्ञानिकाने असा दावा केला आहे की, ‘डिप्रेशन आणि तणावासारख्या समस्यांमुळे कोरोना लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो.’

पुढे हे वैज्ञानिक म्हणाले की, ‘डिस्प्रेशन, तणाव आणि एकटेपणा शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करू शकतो. यामुळे अशा व्यक्तींच्या शरीरावर कोरोना लसीचा कमी प्रभाव पडू शकतो.’ जर्नल पर्सपेक्टिव्ह इन सायकोलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशनसाठी स्वीकार झालेल्या एका रिपोर्टनुसार, ‘लसीकरणाच्या २४ तास आधी व्यायाम आणि रात्रीची चांगली झोप घेतल्यामुळे कोरोना लसीचा अधिक चांगला परिणाम होऊ शकतो.’

- Advertisement -

संशोधक म्हणाले की, ‘जरी कठोर तपासणीमध्ये असे समोर आले असेल की, अमेरिकेत मंजूरी मिळालेली कोरोना लस एक मजबूत प्रतिकारशक्ती उत्पादन करण्यासाठी प्रभावी आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात त्वरित याचा परिणाम पाहायला मिळणार नाही. एखाद्या व्यक्तिच्या अनुवांशिक, शारिरीक आणि मानसिक आरोग्य शरीरातील प्रतिकारशक्तीला कमजोर करू शकते आणि यामुळे लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो.’

अमेरिकेच्या ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक एनेलिस मॅडिसन म्हणाले की, ‘एखाद्या व्यक्तिच्या भावनात्मक तणावाचा प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो. तसेच संक्रमण दूर करण्यासाठी त्यांच्या क्षमतेत बिघाड करू शकतो.’


- Advertisement -

हेही वाचा – भविष्यात कोरोना साध्या ‘सर्दी’ सारखा असणार, तज्ज्ञांचा अंदाज


 

- Advertisement -