DGCI मार्फत सीरम इन्स्टिट्यूटला Covid 19 चाचणीला हिरवा कंदील

serum
Advertisement

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) डॉ. व्हीजी सोमानी यांनी मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला ऑक्सफोर्ड कोव्हिड १९ लशीची क्लिनिकल ट्रायल पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. डीसीजीआयने सीरम इंस्टिट्यूटला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाचीही परवानगी दिली आहे. सीरम इंस्टिट्यूट भारतात ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीच्या लशीची निर्मिती ब्रिटनच्या एस्ट्रेजेनिकासोबत तयार करत आहे. याआधी ब्रिटनमध्ये या चाचणीला स्थगिती दिल्यानंतर भारतातही सीरम इन्स्टिट्यूटने या चाचणीला बंदी घातली होती.

डीसीजीआय दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची याआधीची घातलेली बंदी मागे घेत दिलासा दिला आहे. पण डीसीजीआयने ही परवानगी देताना काही अटी व शर्थी सांगितल्या आहेत. एसआयआयला डीजीसीआय मार्फत आव्हानात्मक परिस्थितीत लढण्यासास नियमानुसार काय उपाययोजना करता येतील याचीही माहिती देण्यास सांगितले. आहे. य़ाआधी ११ सप्टेंबरला डीसीजीयआयला सीरम इन्स्टिट्यूटने निर्देश दिले होते. त्यामध्ये एका व्यक्तीची तब्येत खालावत चालल्याने या चाचणीला थांबवावे असे आदेश देण्यात आले होते.

ब्रिटनमध्ये औषध निर्मात्या कंपनीने एक व्यक्ती आजारी पडल्यानंतर ८ सप्टेंबरला चाचणीवर बंदी आणली होती. भारतातही याआधीच १०० लोकांवर २६ ऑगस्टपासूनच चाचणीला सुरूवात झाली होती. त्यामध्ये ३४ विद्यापिठातील लोकांना ही लस देण्यात आली होती. पण ही लस दिल्यानंतर भारतात मात्र कोणत्याही लोक चाचणी दरम्यान आजारी पडल्याचे दिसून आले नाही.