घरदेश-विदेशपेटीएम पीएमसाठी करतंय हेरगिरी? कोब्रापोस्टचा दावा

पेटीएम पीएमसाठी करतंय हेरगिरी? कोब्रापोस्टचा दावा

Subscribe

कोट्यवधी यूजर्सचा डेटा लीक झाल्याचा संशय

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशात रोखीची चणचण निर्माण झाली. त्यामुळे देशातील सर्व व्यवहार कॅशलेस करण्याच्या दृष्टीकोनातून पाऊलं उचलण्यात आली. त्याचाच भाग म्हणून मनी ट्रान्सफर अॅप वापरणे सुरू झाले. त्यामध्ये ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी प्रामुख्याने पेटीएम हे अॅप वापरले जाऊ लागले. पंरतु पेटीएमने त्यांच्या करोडो युजर्सचा डेटा पंतप्रधानांच्या आदेशावरून पंतप्रधान कार्यालयाला दिला असल्याचा खळबळजनक दावा कोब्रापोस्ट या वेबसाईटने केला आहे.

कोब्रापोस्टने पेटीएमचे उपाध्यक्ष सुधांशू गुप्ता यांचे स्टिंग ऑपरेशन केले. शुक्रवारी रात्री स्टींग ऑपरेशनचा व्हिडीओ कोब्रापोस्टच्या वेबसाईटवर अपलोड झाला. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताच या विषयाची चर्चा आता होऊ लागली आहे. सध्या सोशल मीडीयावर नेटीझन्स त्यांचा संताप व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

सरकारचा नोटबंदीचा निर्णय मनी ट्रान्सफर करणाऱ्या अॅप्सच्या पथ्यावर पडला. त्यामुळे ऑनलाईन बँकिंगप्रमाणे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी विविध अॅप्सचा वापर सुरू झाला. जाहिरातींच्या जोरावर पेटीएम अॅपने बाजी मारत सर्वाधिक ग्राहक स्वत:कडे वळवले. डिजीटल इंडियाची सुरूवात म्हणून पंतप्रधानांचे फोटो सर्रासपणे पेटीएमच्या जाहिरातींवर झळकले. त्यामुळे करोडो भारतीयांनी पेटीएम वापरणे सुरू केले. आधी मोबाईल रिचार्ज, वीज बिल, टेलिफोन, ब्रॉड बँड बिल, टाटा स्काय, डिश टीव्ही, डी२एच इत्यादी सेवांचे रिचार्ज करण्यासाठी पेटीएम अॅप वापरले जात होते. परंतु नोटबंदीनंतर अगदी भाजीवाल्यापासून ते मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी पेटीएमचा वापर सुरू झाला.
पेटीएम वापरण्यापूर्वी युजरला त्यांची माहिती अॅपला द्यावी लागते. यामध्ये फोन क्रमांक, ई मेल आयडी, लोकेशन तसेच बँक खात्याच्या माहितीचा समावेश असतो. त्यामुळे पेटीएमकडे त्यांच्या कोट्यवधी युजर्सचा डेटा आहे. हा डेटा पेटीएमने पंतप्रधान कार्यालयाला दिला असल्याचा कोब्रापोस्टचा दावा आहे.

ऑपरेशन १३६: पार्टी- २
कोब्रापोस्टने ‘ऑपरेशन १३६: पार्टी- २’ या नावाने पेटीएमच्या उपाध्यक्षांचे स्टिंग ऑपरेशन केले. या ऑपरेशनबाबत गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहे.

- Advertisement -


पेटीएम वापरू नका
युजर्सचा डेटा लीक होत असल्याची माहीती मिळताच सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटीझन्सनी पेटीएम वापरू नका असे सल्ले देण्यास सुरूवात केली आहे. ट्विटरवर सध्या #paytmmatkaro हा हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये आहे.

चीनची भागीदारी
पेटीएममध्ये चीनची आघाडीची ऑनलाईन कंपनी अलिबाबा डॉट कॉमची भागीदारी असल्याचे कोब्रापोस्टचे म्हणणे आहे. तसेच काही विदेशी कंपन्यांचीदेखील भागीदारी आहे. त्यामुळे युजर्सचा डेटा सूरक्षित असेल का? असा प्रश्न नेटीझन्सनी उपस्थित केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -