घरदेश-विदेशइंधन कंपन्यांना अच्छे दिन! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

इंधन कंपन्यांना अच्छे दिन! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

Subscribe

इंधन कंपन्यांना अच्छे दिन ! पेट्रोल -डिझेलच्या किमतींनी मागील सात दिवसांत नवा उच्चांक गाठला आहे. पेट्रोलच्या किंमतीत ३३ पैशांनी तर डिझेलच्या दरात ६ पैशांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा ७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर, दिल्लीत पेट्रोल ७६ रूपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. देशातल्या प्रमुख शहरांची तुलना करता मुंबईत पेट्रोल सर्वात महाग मिळत आहे. प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळे कर लावण्यात आले आहेत.

का वाढतात पेट्रोल- डिझेलच्या किमती?

- Advertisement -

पेट्रोल -डिझेलच्या किमती या आंतरराष्ट्रीय तेलांच्या किमतीवर ठरत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्या का त्याचा परिणाम हा पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर होत असतो. आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. त्याचा परिणाम हा इंधनाच्या किंमतीवर होतोय. शिवाय भारताला मोठ्या प्रमाणार कच्चे तेल हे आयातच करावे लागते. पेट्रोलच्या किंमतीमध्ये करांचा वाटा ५० टक्के तर डिझेलच्या किंमतीमध्ये ४० टक्के करांचा वाटा असतो. पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कर, वॅट आणि डिलर्सचे कमिशन आकारले जाते. वॅटचा कर प्रत्येक राज्यानुसार बदलत जातो त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळया असतात.

सुप्रिया सुळेंची टीका

- Advertisement -

आजवरचे सर्वात महाग पेट्रोल ग्राहकांना घ्यायला भाग पाडल्याबद्दल सरकारचे अभिनंदन अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सामान्यांची प्रतिक्रिया काय?

मागील काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिक आता राग व्यक्त करत आहेत. त्यातच मुंबईत पेट्रोल सर्वाधिक महाग आहे. परिणामी मुंबईकरांनी सरकारविरोधात राग व्यक्त केलाय. २०१४च्या निवडणुकीत प्रचारादरम्यान भाजपाने महागाईवर ताबा मिळवू, असे आश्वासन दिले होते. तोच दुवा पकडत अच्छे दिन कुणाचे इंधन कंपन्याचे का? असा संतप्त सवाल जनता विचारत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -