घरट्रेंडिंगस्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकावण्याची भिन्न पद्धत, पण का?

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकावण्याची भिन्न पद्धत, पण का?

Subscribe

स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकावण्याची पद्धत आणि प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकावण्याची पद्धत वेगवेगळी आहे. इतकंच नाही, तर ते फडकावणाऱ्या व्यक्ती देखील भिन्न असतात.

आज देशभरात ७१व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. देशभरात विविध ठिकाणी देशवासियांनी आपापल्या पद्धतीने देशाचा ध्वज अर्थात तिरंगा फडकावला. काही ठिकाणी पालकमंत्र्यांनी, काही ठिकाणी राज्यपालांनी, काही ठिकाणी मंत्र्यांनी तर काही ठिकाणी लष्कराने आपापल्या पद्धतीने ध्वजारोहण केलं. दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तर महाराष्ट्रात मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तिरंगा फडकावला. पण पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी ध्वज का फडकावला नाही? स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये का फरक आहे? याची उत्तरं देशाच्या इतिहासात आणि ध्वज फडकावण्याच्या शिष्टाचारात सापडतात!

१५ ऑगस्ट अर्थात देशाच्या स्वातंत्र्यदिनी ध्वज वेगळ्या पद्धतीने फडकावला जातो. तर २६ जानेवारीला वेगळ्या पद्धतीने फडकावला जातो. यात नेमका फरक काय आहे?

- Advertisement -

पहिला फरक – ध्वज फडकावणारी व्यक्ती

यातला पहिला फरक म्हणजे १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतात. तर २६ जानेवारीला देशाचे राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकावतात. याचं कारण म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, तेव्हा राष्ट्रपती हे पद अस्तित्वात आलेलं नव्हतं. कारण तेव्हा देश प्रजासत्ताक नव्हता. राज्यघटनाच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे त्या दिवशी पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकावतात. तर २६ जानेवारी १९५० रोजी देशानं राज्यघटनेचा स्वीकार केला, देश प्रजासत्ताक झाला आणि राष्ट्रपती हे घटनात्मक पद अस्तित्वात आलं. त्यामुळे या दिवशी राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकावतात.

दुसरा फरक – राष्ट्रध्वजाची जागा

दुसरा फरक म्हणजे १५ ऑगस्टला ध्वज दांडीला खाली बांधलेला असतो. पंतप्रधान तो दोरीच्या सहाय्याने वर चढवतात आणि नंतर फडकावतात. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या यशाचं द्योतक म्हणून या दिवशी ध्वज खालून वर चढवला जातो. त्याउलट २६ जानेवारी रोजी ध्वज दांडीच्या वरच्या टोकाला बांधलेला असतो. राष्ट्रपती दोरी खेचून तिथेच ध्वज फडकावतात. कारण या दिवशी देश आधीपासूनच स्वतंत्र होता आणि प्रजासत्ताक झाला.

- Advertisement -

तिसरा फरक – ध्वज फडकावण्याचं ठिकाण

तिसरा फरक म्हणजे १५ ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावतात. देशाचे कार्यकारी प्रमुख म्हणून लाल किल्ल्यावरूनच ते देशाला उद्देशून भाषण करतात. तर २६ ऑगस्टला राष्ट्रपती राजपथावर राष्ट्रध्वज फडकावतात. देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून राजपथावरील पथसंचलनाला उपस्थिती लावतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -