द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधींची प्रकृती नाजूक

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची प्रकृती नाजूक आहे. चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचा मुलगा एम. के. स्टालिन सध्या रुग्णालयात हजर आहे.

Chennai
karunanidhi
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार करुणानिधी यांची प्रकृती नाजूक असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. करुणानिधी यांच्या हृदयाचे ठोके धिम्या गतीने चालत आहेत. करुणानिधी यांचा मुलगा एम. के. स्टालिन रुग्णालयात हजर झाले आहेत. दरम्यान, द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बाहेर गर्दी केली आहे.

२८ जुलैला करुणानिधी रुग्णालयात

रक्तदाब कमी झाल्याने ९४ वर्षीय करुणानिधी २८ जुलैला कावेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यानंतर त्यांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे निदान झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील होऊ लागली होती. त्यामुळे त्यांना दोन ते तीन दिवसात डिस्चार्ज मिळणार असेही द्रमुकच्या सचिवांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली भेट

रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोंविद करुणानिधी यांना बघण्यासाठी कावेरी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी करुणानिधी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर राष्ट्रपती भवनच्या औपचारिक ट्विटर हँडलवरून याविषयी ट्विट करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here