नरेंद्र मोदींचा समर्थक असल्यामुळे वृद्धाची हत्या

तमिळनाडूमध्ये नरेंद्र मोदींचे समर्थन करुन त्यांचे प्रचार करणे डीएमके-काँग्रेसच्या समर्थकाच्या डोळ्यात खुपसले आहे. त्यामुळे त्याने ७५ वर्षीय वृद्धाची हत्या केली आहे.

Chennai
man killed his wife and three children
शिक्षकाने केली पत्नी आणि ३ मुलांची हत्या

सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. परंतु, या प्रचारांमधून दोन वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वैर निर्माण होऊन हाणामारीच्या घटना घडण्याची घडण्याची दाट शक्यता असते. महाराष्ट्रात तर एकाच पक्षातील दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वैर कोणत्याही टोकावर जाऊ शकते. दरम्यान, तमिळनाडूमध्ये याच संदर्भातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोदी समर्थक असल्यामुळे एक ७५ वर्षीय वृद्धाची हत्या डीएमके-काँग्रेस युतीच्या समर्थकाने केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

तमिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या डीएमके-काँग्रेस युतीच्या एका समर्थकाने केली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव गोविंदराज असे होते. गोविंदराज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा प्रचार करत होते. जयललिता आणि मोदींचे फोटो असेलेले टी-शर्ट परिधान करुन ते राज्यभरात नरेंद्र मोदींचा प्रचार करत होते. परंतु, नरेंद्र मोदींचे अशाप्रकारे प्रचार करणे डीएमके-काँग्रेसच्या एका समर्थकाच्या डोळ्यात खुपसले. त्याने थेट गोविंदराज यांना धमकवण्याच प्रयत्न केला. यातून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या वादातूनच शनिवारी रात्री डीएमके-काँग्रेसचा समर्थक गोपीनाथ याने गोविंदराज यांची हत्या केली. हत्या करणाऱ्या गोपीनाथला रविवारी पोलिसांनी अटक केली. गोपीनाथ हा डीएमके-काँग्रेस समर्थक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.