काँग्रेस अध्यक्षांनी वायुदलावर संशय घेणं दुर्दैवी

राहुल गांधी भारतीय वायुदलावर संशय घेणारे कोण आहेत? एखादा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असा कसा सवाल विचारू शकतो. त्याचप्रमाणे सॅम पित्रोदा यांनी एअर स्ट्राईकबाबत केलेलं वक्तव्य चिंताजनक आहे. असा सवाल उठवत अमित शहा यांनी कॉँग्रेसवर टीका केली आहे.   

Mumbai
Amit shaha on congress
अमित शहा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुलवामा हल्ल्यावरून कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. पुलवामासारखा हल्ला ही रोजच घडणारी घटना आहे असे कॉँग्रेसला वाटते का? राहुल गांधी भारतीय वायुदलावर संशय घेणारे कोण आहेत? एखादा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असा कसा सवाल विचारू शकतो. त्याचप्रमाणे सॅम पित्रोदा यांनी एअर स्ट्राईकबाबत केलेलं वक्तव्य चिंताजनक आहे. असा सवाल उठवत अमित शहा यांनी कॉँग्रेसवर टीका केली आहे.

कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्याबरोबरच अमित शहा यांनी सॅम पित्रोदांवरही निशाणा साधला आहे. सॅम पित्रोदा यांनी केलेलं वक्तव्य चिंताजनक आहे. सॅम पित्रोदा असोत किंवा कॉँग्रेस यांना वाटते की लष्कर आणि पाकिस्तान सरकार यांच्यात हल्ल्यासंदर्भात काही संबंध आहे? असा संबंध जर असेल तर दोष कुणाचा आहे? याचं उत्तर कॉँग्रेसने द्यावं असंही अमित शहा यांनी यावेळी म्हटलं.

यावेळी अमित शहा यांनी आणखी मुद्दा विचारला, जेव्हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारताच्या विरोधात नारेबाजी होते तेव्हा कॉँग्रेस त्या गोष्टीला अभिव्यक्त स्वातंत्र्याचा दर्जा देते आणि पुलवामा हल्ला जेव्हा होतो तेव्हा पुरावे मागितले जातात. ही अतिशय दुख:द घटना आहे.

भ्याड पुलवामा हल्ला

१४ फेब्रुवारीला देशात पुलवामा या ठिकाणी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे चाळीस जवान शहीद झाले. या घटनेचा बदला घेण्यासाठी भारताने बालाकोट या ठिकाणी एअर स्ट्राईक केला. आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ नेस्तनाबुत केला. या एअर स्ट्राईकनंतर विरोधीपक्ष सरकारकडे नक्षलवाद्यांच्या मृतदेहांच्या फोटोंची मागणी करत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here