खळबळजनक! स्टोनच्या नावावर काढली रुग्णाची किडनी

स्टोनच्या नावावर एका रुग्णाची किडनी काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

doctor accused took out patient kidney during stone operation patna bihar
खळबळजनक! स्टोनच्या नावावर काढली रुग्णाची किडनी

मुंबईतील एका रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल करुन किडनी काढल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी मुंबईत घडल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच बिहारमध्ये अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. बिहारची राजधानी लखनौच्या एका खाजगी रुग्णालयामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या पोटात स्टोन असल्याचे निष्पन झाले. त्यानंतर त्या रुग्णाचे ऑपरेशन करण्याचे ठरवले. ऑपरेशन दरम्यान, या रुग्णाची किडनी काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून रुग्णाचे नातेवाईक चांगलेच संतापले असून त्यांनी एकच गोंधळ घातला आहे. गोंधळ वाढताच रुग्णालयामधील स्टाफने तेथून पळ काढला.

एका हिंदी वृत्तानुसार; ही घटना कंकडबागच्या रोड नंबर ११ वर स्थित एका नर्सिंग होममध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार; बेगुसरायहून एक तरुण आला होता. त्या तरुणाच्या अचानक पोटात दुखण्यास सुरुवात झाली. त्यामुळे तरुणाला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला सांगितले की, त्याच्या पोटात स्टोन आहे आणि ऑपरेशन करून तो काढावा लागेल. पण, ऑपरेशननंतर रुग्णाच्या परिवाराला कळले की, डॉक्टरने रुग्णाच्या पोटातून स्टोनऐवजी किडनीच काढली आहे. या घटनेची माहिती समोर येताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली.


हेही वाचा – दिवाळीत दिल्लीतील प्रदूषणाने मोडला मागच्या चार वर्षांचा रेकॉर्ड