‘हे’ सॉफ्ट टॉय नाही तर आईस्क्रीम!

Mumbai
dog shaped ice cream
जपानच्या तैवानमधील काओसिउंग शहरात हे खास 'डॉग आईस्क्रीम' बनतं. (सौ-इन्स्टाग्राम)

जगभरात असे अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यांची अजब-गजब नावं आणि चित्रविचित्र आकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलं एक मुख्य उदाहरण म्हणजे ‘हॉट डॉग’. मात्र, सध्या एक वेगळाच डॉग अर्थात कुत्रा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. प्रथमदर्शनी हा कुत्रा तुम्हाला एखादं सॉफ्ट टॉय किंवा बॅटरीवर चालणारं खेळणं वाटतं. मात्र, ज्यावेळी त्याचं खरं रुप तुमच्यासमोर येतं तेव्हा त्यावर विश्वास बसणं कठीण होतं. हा कुत्रा एखादं खेळणं की शोपिस नसून चक्क गारगार गोड आईस्क्रीम आहे. कुत्र्याच्या आकाराचं हे आईसक्रीम सध्या इंटरनेटवर चांगलच व्हायरल होतं आहे. हे स्पेशल ‘डॉग आईस्क्रीम’ इतकं चविष्ट आहे की त्याची चव जगभरात लोकप्रिय आहे. जपानच्या तैवानमधील काओसिउंग या शहरात या खास आईस्क्रीमची निर्मीती होते. काओसिंगच्या ‘जेसी को आर्ट किचन’मध्ये हे डॉग आईस्क्रीम बनवले जाते. कुत्र्याच्या रंग-रुपातलं हे भन्नाट सध्या इन्स्टाग्रामवरही भलतच फेमस झालं आहे.

आईस्क्रीमला जगभरातून मागणी

उपलब्ध माहितीनुसर जगभरातील पर्यटक तैवानमध्ये आल्यानंतर खास हे आईस्क्रीम खाण्यासाठी ‘जेसी को आर्ट किचन’ला भेट देतात. त्यात सध्या सोशल मीडियावर हे आईस्क्रीम झपाट्याने व्हायरल होत असल्यामुळे आईस्क्रीम लव्हर्स त्याकडे अधिकच आकर्षित झाले आहेत. दरम्यान या चवदार ‘आईस्क्रीम’ची किंमत भारतीय चलनाप्रमाणे सुमारे २५० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत आहे. मिल्क टी, चॉकलेट आणि पिनट या तीन फ्लेवर्समध्ये हे आईस्क्रीम उपलब्ध आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार हे आईसक्रीम बनवण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागत असून दिवसाला साधारण अशी १०० आईस्क्रीम्स बनवली जातात.

Video: असं बनतं हे ‘डॉग आईस्क्रीम’