कोरोना होणे म्हणजे देवाचा आशीर्वाद; ट्रम्प उवाच

Donald Trump calls catching coronavirus 'blessing from God'
कोरोना होणे म्हणजे देवाचा आशीर्वाद; ट्रम्प उवाच

कोरोनाबाधित असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते व्हाइट हाउसवर शिफ्ट झाले. ट्रम्प कोरोनातून पूर्णपणे बरे झाले नसून सध्या व्हाइट हाउसमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोरोनाची लागण होणे हा देवाचा आशीर्वाद असल्याचे डोनाल्ड म्हणाले आहेत. तसेच कोरोनाची लागण झाल्यामुळे या विषाणूशी लढणाऱ्या औषधांची माहिती मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वॉल्टर रीड रुग्णालयात उपचार सुरू होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी हेलिकॉप्टरमधून प्रवास करून व्हाइट हाउसला पोहोचले. व्हाइट हाउसला पोहोचताच चेहऱ्यावरचा मास्क काढताना ट्रम्प दिसले. तसेच त्यांनी पहिल्यांदा एक व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेसचे कौतुक केले. तसेच कोरोनावरील औषधे सर्व अमेरिकन नागरिकांना मोफत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. पण डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेल्या डिस्चार्ज संदर्भात अनेक तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांना सुरुवातील कोरोनावर प्रभावी असणारी Remdesivir आणि REGN-COV2 औषधं दिली होती. पण आता डॉक्टरांनी त्यांना डेक्सामेथासोन औषध दिले असल्याची माहिती समोर येत आहे. डेक्सामेथासोन हे औषध ऑक्सिजनची कमतरता असल्यावर दिले जाते. त्यामुळेच ट्रम्प यांच्याबाबत विरोधाभास असणारी माहिती समोर येत असल्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.


हेही वाचा – Donald Trump यांना Twitter चा दणका; महिला पत्रकाराला केलेल्या ट्वीटमुळे अकाऊंट लॉक!