घरदेश-विदेशप्रेसिडेंट ट्रम्प ट्विरवर कोणालाही ब्लॉक करु नका!

प्रेसिडेंट ट्रम्प ट्विरवर कोणालाही ब्लॉक करु नका!

Subscribe

न्यूयोर्क फेडरल कोर्टाचे निर्देश

सोशल मीडियावर आपण कोणाला अॅड करावे, करू नये, कोणाला फॉलो करावे, कोणाला ब्लॉक करावे किंवा करू नये, यापैकी कोणत्याही हालचालीवर कोणीही सक्ती करू शकत नाही, परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर कोणालाही ब्लॉक करू शकत नाहीत. असा आदेश कोर्टाने दिला आहे. बुधवारी न्यूयॉर्क मधील स्थानिक जिल्हा कोर्टाने संबधित याचिकेवर सुनावणी केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणालाही ट्विटरवर ब्लॉक केलं तर ते संविधानाचे उल्लंघन ठरेल, असे कोर्टाने नमूद केलं आहे. २०१७ मध्ये एका ट्विटर युजरने कोर्टात  याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोर्टाने निकाल दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या युजरला ट्विटरवर ब्लॉक केले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांचे ट्विट पाहण्यापासून कोणालाच रोखू शकत नाहीत. तसा प्रयत्न ट्रम्प करत असतील तर ते संविधानाचे उल्लंघन ठरेल, असे फेडरल कोर्टाचे न्यायाधीश नाओमी रीस बुचवाल्ड यांनी नमूद केलं. सोशल मीडिया हा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प कुणालाही ब्लॉक करू शकत नाहीत. ट्विटरवर कुठल्याही युजरला ब्लॉक करणे म्हणजे ते त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन असल्याचं न्यायाधीश म्हणाले.

- Advertisement -

एखाद्या विषयावर, प्रश्नावर किंवा मुद्द्यावर उत्तर देण्यापेक्षा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्या व्यक्तीला ब्लॉक करतात. त्यामुळे आमचे राष्ट्राध्यक्ष सोशल मीडियावरून लोकांना काय संदेश देतात, हे आम्हाला कसे समजणार, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. युजर्सच्या ट्विट किंवा रिट्विटमुळे तुमचं लक्ष विचलित होत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. असा सल्ला याचिकाकर्त्यांनी ट्रम्प यांना दिला आहे. परंतु युजरला ब्लॉक करणं उपाय नसून ते संविधानाचं उल्लंघन मानलं जाईल. तसेच राष्ट्राध्यक्षांसह कोणताही राजकीय नेता संविधानापेक्षा मोठा नाही. असेही कोर्टाने म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -