घरदेश-विदेशअमेरिकेत जन्मणाऱ्या प्रत्येक बाळाला नागरिकत्व मिळणार नाही- ट्रम्प

अमेरिकेत जन्मणाऱ्या प्रत्येक बाळाला नागरिकत्व मिळणार नाही- ट्रम्प

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत जन्माला येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या नागरिकत्वाचा अधिकार रद्द करण्याची तयारी सुरु केली आहे. या कायद्याद्वारे परदेशी मुलांचा अमेरिकेत जन्म झाला असता त्यांना जन्मता अमेरिकन नागरिकत्वाचा अधिकार मिळत होता.

अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. निवडणुकीदरम्यान अमेरिकेचे मूळ नागरिकांना केलेल्या आश्वासनाला पूर्ण करण्यासाठी ट्रम्प नेहेमी नवीन नियम बनवण्याच्या प्रयत्नात असतात. अमेरिकेत जन्माला आलेल्या परदेशी नागरिकांच्या मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्वाचा हक्क मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहतात आहे. अमेरिकेच्या संविधानातील कायद्याला बदलण्याचा प्रयत्न ट्रम्प करत आहे. एका इंग्रजी वाहिनीला मुलाखत देतांना ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

“परदेशी नागरिकांच्या मुलांचा जन्म अमेरिकेत झाला असता त्यांना नागरिकत्वाचा अधिकार मिळतो. अशी सुविधा फक्त अमेरिकेतच आहे. या अधिकाराचा गैरवापर केला जात आहे. हे खूप विचित्र आहे आणि ते बंद झालं पाहिजे.”- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

कायदा बनवून काही उपयोग नाही

अमेरिकेच्या जमिनीवर जन्म घेणारी व्यक्ती अमेरिकेतील नागरिक आहे. त्याला नागरिकत्वाचा अधिकार मिळणे हा त्याचा जन्म सिद्ध हक्क असल्याचे अमेरिकेच्या संविधानात लिहिले आहे. या कायद्याअंतर्गत अमेरिकेत जन्म घेतलेल्या बाळाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळते. मात्र याचा फायदा अनेक परदेशी नागरिकांनी घेऊन अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले आहे. या घटनांना आळा बसवण्यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न केले आहे. ट्रम्प यांनी कायदा करण्यापूर्वीही याबाबत अमेरिकेकडून काळजी घेतली जाते. अमेरिकेचा प्रवास करण्यापूर्वी गरोदर महिलांची वैद्यकियचाचणी केली जाते. अधिककाळ महिला गर्भवती असल्यास तिला प्रवेश अमेरिकेत प्रवेश दिला जात नाही. मग यासाठी विशेष कायदा बनवण्याची गरज का भासली असा सवाल अमेरिकेतील परदेशी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -