घरदेश-विदेशभारताचा कचरा अमेरिकेत येतोय - डोनाल्ड ट्रम्प

भारताचा कचरा अमेरिकेत येतोय – डोनाल्ड ट्रम्प

Subscribe

ग्रेट पॅसिफिक गारबेज पॅच (जीपीजीपी) येथून कॅलिफोर्निया बीचपर्यंत कचऱ्याचे समुद्रात मोठे साम्राज्य आहे. मात्र, पर्यावरण अभ्यासकांनी सांगितल्यानुसार या कचऱ्याला भारत नाही तर इतर देश जबाबदार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी न्यूयॉर्कच्या इकोनॉमिक क्लब येथे पर्यावरण प्रदुषणाच्या मुद्यावरुन भारतावर टीका केली. भारत आणि चीन देश आपल्या देशांमधील औद्योगिक कारखान्यांच्या चिमन्यांमधून सोडणाऱ्या धूरावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करत नाहीत. फक्त धूरच नाही तर इतर सांडपाण्यावर देखीलही भारत, चीन आणि रशिया या देशांकडून कोणतीही प्रक्रिया केली जात नाही, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. हा कचरा वाहत जाऊन अमेरिकेच्या लॉस एजेंल्स येथे येत असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत.


हेही वाचा – Video : …म्हणून सर न्यायाधीशांने भर कोर्टात घेतले बाळाला कडेवर

- Advertisement -

 

भारतापेक्षा इतर देश जास्त जबाबदार

ग्रेट पॅसिफिक गारबेज पॅच (जीपीजीपी) येथून कॅलिफोर्निया बीचपर्यंत कचऱ्याचे समुद्रात मोठे साम्राज्य आहे. मात्र, पर्यावरण अभ्यासकांनी सांगितल्यानुसार या कचऱ्याला भारत नाही तर इतर देश जबाबदार आहेत. चीन, इंडोनेशिया, फिलीपीन्स, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश या परिस्थितीला जास्त जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतर देशांच्या तुलनेने जगभरात सर्वाधिक जास्त प्रमाणात अमरिका देशात प्रदुषण होत आहे. समुद्रात साठल्या जाणाऱ्या कचऱ्यामध्ये पाण्याच्या बाटल्या, फूड कंटेनर, प्लास्टिकच्या बॅगा आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – २ आठवड्यांत ‘त्या’ नराधमानं केले ३७ बलात्कार!


 

एवढ्या कचऱ्याचे आता काय होणार?

अमेरिकेच्या समुद्रात साठलेल्या या कचऱ्याचे नेमके आता काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. या कचऱ्याचे बंदोबस्त करण्यासाठी विविध देशांमध्ये हा कचरा पाठवला जाणार आहे. मात्र, काही देश स्वत:च्याच देशात साठलेल्या कचऱ्यावर काही प्रक्रिया करु शकत नाहीत मग ते या कचऱ्याची व्हिल्हेवाट कसे लावतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -