घरदेश-विदेश'कोरोना' ही चीनकडून जगाला मिळालेली सर्वात वाईट भेट - ट्रम्प

‘कोरोना’ ही चीनकडून जगाला मिळालेली सर्वात वाईट भेट – ट्रम्प

Subscribe

सध्या जगातील कोरोना व्हायरसमुळे अमेरिका सर्वाधिक कोरोना बाधित असणारा देश

सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले असून संवेदनशील झाले आहे. कोरोनामुळे कोट्यवधी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमधील वुहान शहरातून आलेल्या या व्हायरसचा परिणाम जगातील सर्व देशांवर झाला आहे. सर्वाधिक बाधित देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर चांगलाच निशाणा साधला आहे.

कोरोना ही चीनकडून मिळालेली वाईट भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर चांगलाच हल्लाबोल केला आहे, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “कोरोना व्हायरस ही संपूर्ण जगासाठी चीनकडून मिळालेली एक अत्यंत वाईट भेट आहे.” तसेच ते पुढे म्हणाले “कोरोना व्हायरसमुळे आणखी मृत्यू झाल्यास अमेरिका लाखांपर्यंत पोहोचणार आहे. कुटूंब आणि मित्रांबद्दल मी मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. अशा परिस्थितीत लढणाऱ्यांसोबत माझे प्रेम आहे तसेच देव नेहमी तुमच्या सर्वांबरोबर राहो.”

- Advertisement -

अमेरिकेत सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण

सध्या जगातील कोरोना व्हायरसमुळे अमेरिका सर्वाधिक कोरोना बाधित असणारा देश आहे. अमेरिकेत आतापर्यंत १७ लाख ५८ हजार ४२२ कोरोना रूग्णांची नोंद केली गेली आहे. यामध्ये ३ लाख ७८ हजार ५६६ लोक पूर्णपणे बरे झाले आहेत परंतु १ लाख २ हजार ९१७ लोकांच्या या साथीने बळी घेतला आहे. सध्या जगात एकूण कोरोना बाधितांची संख्या ५९ लाख ५ हजार ४१५ आहे. संपूर्ण जगात २५ लाख ७९ हजार ६७८ लोक बरे झाले आहेत. तर जगभरात कोरोनामुळे ३ लाख ६२ २४ लोकांचा बळी गेला आहे.


Coronavirus: लस तयार झाल्यानंतरही कोरोना व्हायरस नष्ट होणार नाही – वैज्ञानिक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -