घरताज्या घडामोडीडोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूवर मात केल्याचे समोर आले आहे. सोमवारी व्हाइट हाऊसचे डॉक्टर सीन कॉनली (Sean Conley) यांनी फ्लोरिडामध्ये प्रचार मोर्चाच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे जाहीर केले. १० दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

व्हाइट व्हाइसचे डॉक्टर सीन कॉनली म्हणाले की, ‘डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी आता निगेटिव्ह आल्याचे मी जाहीर करत आहे.’ यापूर्वी सीन कॉनली शनिवारी रात्री म्हणाले की, ‘आजच्या रात्री हे जाहीर करतात मला खूप आनंद होत आहे की, आता राष्ट्राध्यक्ष कोरोनाच्या धोका नाही आहे. आता ते दैनंदिन आयुष्यात परत येऊ शकतात. गेल्या शुक्रवार पासून त्यांना ताप नाही आहे. कोरोना संबंधित सांगितलेले उपचार त्यांच्यावर पूर्ण झाले आहेत.ट

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, ‘राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात समजले होते आणि या शनिवारी याला १० दिवस पूर्ण झाले. येणाऱ्या शनिवारपर्यंत दैनंदिन जीवनात परत येणे त्याच्यासाठी सुरक्षित राहील.’ फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, ‘मला बरे आणि खूप चांगले वाटत आहे. मी तयार आहे, मला मोर्चा करायचा आहेत.’

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वॉल्टर रीड रुग्णालयात उपचार सुरू होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी हेलिकॉप्टरमधून प्रवास करून व्हाइट हाउसला पोहोचले. पण यावेळीडोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेल्या डिस्चार्ज संदर्भात अनेक तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना होणे म्हणजे देवाचा आशीर्वाद; ट्रम्प उवाच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -