घरट्रेंडिंगसाबरमती आश्रमातील वहीत डोनाल्ड ट्रम्प यांनी नक्की लिहीलं काय?

साबरमती आश्रमातील वहीत डोनाल्ड ट्रम्प यांनी नक्की लिहीलं काय?

Subscribe

– अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज भारत दौऱ्यावर आहे. सकाळी ११.४० ला ट्रम्प यांचे सहकुटुंब भारतातील अहमदाबाद येथील विमानतळावर आगमन झाले. एकूण ३६ तासांचा हा दौरा असणार आहे. भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प सातवे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारतात असतील. यानिमित्त अहमदाबाद येथे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ट्रम्प हे विमानतळावरून निघाल्यानंतर ‘रोड शो’मध्ये त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागत करणार आहेत. ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प अतिशय व्यस्त असणार आहेत.

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अहमदाबादच्या विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय संस्कृतीचं दर्शन डोनाल्ड ट्रम्प यांना विमानतळावर घडलं. विमानतळावरून निघाल्यावर ट्रम्प यांनी सपत्नीक साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी बापूजींना अभिवादन केले. आणि सपत्नीक सुतकताई देखील केली. यावेळी साबरमती आश्रमातून बाहेर आल्यावर आश्रमाच्या पायऱ्यांवर निवांत बसले. त्यानंतर मात्र आश्रमातून बाहेर पडल्यावर एका वहिवर ट्र्म्प यांनी आपल्या हस्ताक्षरात काहीतरी लिहीले. आता सगळ्यांनाच उत्सुकता होती की डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय लिहीलं आहे.

- Advertisement -

साबरमती आश्रमातून बाहेर पडल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. ‘to my great friend prime minister modi for this wonderful visit’ म्हणजेच ‘ धन्यवाद माझा मित्र पंतप्रधान मोदी या सुंदर भेटीसाठी’. हा संदेश लिहील्यानंतर त्यांनी खास आपल्या शैलीत स्वाक्षरी देखील केली आहे.

मौर्या हॉटेलमध्ये असेल मुक्काम

दिल्लीत आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा जिल्ह्य़ांतील पोलीस तसेच केंद्रीय सशस्त्र दलांच्या ४० कंपन्या तैनात केल्या आहेत. ६०५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. चाणक्य या सूटमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली असून यापूर्वी जिमी कार्टर, बिल क्लिंटन, जॉर्ज बुश यांचीही व्यवस्था याच सूटमध्ये केली होती. ट्रम्प यांना सोन्याच्या ताटात जेवण व चांदीच्या पेल्यात चहा दिला जाणार आहे.

मोदींसोबत चर्चा

डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी मोदी हे आपले खास मित्र असल्याचे म्हटले असले तरी भारताने आयात कर लादून अमेरिकेचे नुकसान केल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार तूट कमी करण्याच्या दिशेने उपाययोजना करणे हाच या भेटीचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येते. संरक्षण, दहशतवाद, विद्युत आदी मुद्द्यांचा चर्चेत समावेश असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -