घरदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प म्हणतात, '२०२४ ला मी पुन्हा येईन'

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘२०२४ ला मी पुन्हा येईन’

Subscribe

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन यांनी आपला पराभव केल्याचे मान्य करत डोनाल्ड ट्रम्प आता व्हाइट हाऊसमधील आपल्या सामानाची आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, व्हाइट हाऊस सोडण्यापूर्वी मंगळवारी ट्रम्प यांनी एका हॉलीडे रिसेप्शनचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ते २०२४ ची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे आता ट्रम्प यांनी २०१४ च्या निववडणुकीसाठी आतापासून तयारी सुरु केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कार्यकाळाबद्दल बोलताना ही चार वर्षे खूपच छान होती, असे म्हणाले. ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या पार्टीत रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय समितीमधील अनेक सदस्य उपस्थित होते. ट्रम्प यांनी या सदस्यांना उद्देशून बोलाताना, “आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला अजून चार वर्षे सेवेसाठी मिळावीत. म्हणूनच मी तुम्हाला भेटीसाठी चार वर्षांनंतर पुन्हा येईन असेच आत्ता सांगू शकतो, असे म्हणाले. दरम्यान, २० जानेवारीप्रयंत जो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातात घेतील. ट्रम्प यांनी २०२४ ची निवडणूक लढण्यासंदर्भात आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत चर्चाही केली आहे. जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले असले तरी पुढील काळात प्रसारमाध्यमांमध्ये ट्रम्प यांची चलती असेल असा ट्रम्प समर्थकांचा अंदाज आहे.

- Advertisement -

तथापि, विशेष बाब म्हणजे सेव्हन लेटर इनसाइड नावाच्या एका संस्थेने २०२४ निवडणुसाठीचे सर्वेक्षण केले. यामध्ये ट्रम्प यांनी २०२४ ची निवडणूक लढवली तर ६६ टक्के रिपब्लिकन मतदार त्यांना मतदान करतील, असे या सर्वेमध्ये दिसून आले. तर मॉर्निंग-कंसल्ट-पोलिटिकोच्या सर्वेक्षणात ५४ टक्के रिपब्लिकन मतदारांनी पक्षाकडून निवडण्यात येणाऱ्या उमेदावाराच्या निवडीमध्ये ते प्राथमिक उमेदवार म्हणून ट्रम्प यांच्या बाजूने मत देतील असे म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -