Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग डोनाल्ड ट्रंप यांच्या फेसबुक, इंस्टाग्रामवर अनिश्चित कालावधीसाठी बंदी

डोनाल्ड ट्रंप यांच्या फेसबुक, इंस्टाग्रामवर अनिश्चित कालावधीसाठी बंदी

Related Story

- Advertisement -

अमेरिकन मावळते राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचे फेसबुक अकाऊंट अनिश्चित कालावधीसाठी ब्लॉक करण्यात येत असल्याची घोषणा गुरूवारी Facebook मार्फत करण्यात आली. फेसबुकचे मुख्य कार्यकारी Mark Zukerberg यांनी स्पष्ट केले की, ट्रंप यांच्या पोस्टवर नियंत्रण राहिले नसल्यानेच फेसबुकमार्फत हे पाऊल उचलण्यात आले आहे. याआधी Twitter ने ट्रंप यांच्या ट्विटर हॅंडलवर १२ तासांसाठी बंदी घातली होती. फेसबुकनेही सुरूवातीला २४ तासांसाठी ट्रंप यांचे अकाऊंट सस्पेंड केले होते.

फेसबुकचा वापर हा कॅपिटमधील हिंसाचार भडकावण्यासाठी केला असल्याचा आरोप फेसबुकमार्फत ट्रंप यांचे अकाऊंट बंद करताना करण्यात आला. ट्रंप समर्थकांनी हिंसाचार करत संसदेच्या परिसरात तसेच आतल्या भागातही नुकसान केले होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर जो बाइडन यांच्या विजयाच्या घोषणेबाबतची चर्चा संसदेत सुरू असताना डोनाल्ड ट्रंप समर्थकांकडून हिंसाचार उफाळून आला होता. फेसबुकमार्फत घालण्यात आलेली बंदी ही ट्रंप यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही अकाऊंटवर लागू असणार आहे. जोपर्यंत ट्रंप व्हाईट हाऊस सोडत नाहीत, तोवर ही बंदी कायम असेल असे फेसबुकमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

The shocking events of the last 24 hours clearly demonstrate that President Donald Trump intends to use his remaining…

Posted by Mark Zuckerberg on Thursday, January 7, 2021

 

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना आमचे फेसबुकचे प्लॅटफॉर्म सातत्याने वापरण्यासाठी अटी व शर्थींसह परवानगी दिलेली आहे. ज्यावेळी फेसबुकच्या पॉलिसीजच्या भंग झाल्याचा मजकुर आढळला किंवा त्यांच्या पोस्टबाबत आक्षेप नोंदवण्यात आले तेव्हाही आम्ही त्या पोस्ट काढून टाकल्या नाहीत, असे फेसबुकने स्पष्ट केले आहे. राजकीय भाषणे एकण्याची संधी सर्वसामान्यांना मिळावी हा त्यामागचा उद्देश होता, त्यामुळे वादग्रस्त अशी भाषणेही आम्ही फेसबुकवरून हटवली नाहीत. लोकांचा हा अधिकार आहे म्हणूनच आम्ही हा एक्सेस दिला असे फेसबुकने स्पष्ट केले आहे. पण नुकतीच घडलेली घटना ही मूळातच विभिन्न आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या हिंसा भडकवण्यासाठी फेसबुकचा वापर केला गेला, असे झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

donald trump tweet

ट्विटरकडूनही ट्रंप यांच्या अकाऊंटवर १२ तासांची बंदी ठेवण्यात आली आहे. पण ट्विटरला यापुढच्या काळात अशा वादग्रस्त ट्विट्स दिसल्या तर कायमचे अकाऊंट बंद करण्यात येईल असे इशारा ट्विटरमार्फत देण्यात आला आहे. याआधीच ट्विटर पॉलिसी या अकाऊंटवरून स्पष्ट करण्यात आले होते की, वादग्रस्त असे तीन ट्विट आम्ही डिलीट करत आहोत. ट्विटरच्या civiv Intergrity Policy चा भंग असला कारणाने हे ट्विट डिलीट करत असल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले होते.

सोशल मिडिया अकाऊंट हे अनेकदा राजकीय व्यक्तींविरोधात कारवाई करताना थोडा वेळ घेतात. डोनाल्ड ट्रंप यांच्याबाबतीतही अनेकदा कारवाई करण्यासाठी सहसा सोशल मिडिया प्लॅटफॉर्मने पुढाकार घेतले नाहीत. पण तज्ञांकडून मात्र डोनाल्ड ट्रंप यांचे अकाऊंट वारंवार टिकेचे लक्ष व्हायचे. गेल्या वर्षी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपासूनच ट्विटरने डोनाल्ड ट्रंप यांच्या पोस्टचे लेबलिंग करण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण फेसबुकने मात्र कोणतीच कारवाई न केल्याने फेसबुकला अनेक तज्ञ, युजर्स आणि कर्मचाऱ्यांनीही टार्गेट केले होते.


 

- Advertisement -