घरअर्थजगतचिंता करु नका, माझ्या पुतण्याचे खातेही 'येस' बॅंकेतच - एसबीआय अध्यक्ष

चिंता करु नका, माझ्या पुतण्याचे खातेही ‘येस’ बॅंकेतच – एसबीआय अध्यक्ष

Subscribe

येस बॅंकेच्या सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत. माझ्या पुतण्याचे खातेही एस बँकेतच आहे. त्यामुळे चिंता करू नका असे वक्तव्य स्टेट बॅंक ऑफ इंडीयाचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी केले आहे. 

जगभरात आर्थिक मंदी असल्याने याचा फटका भारतालाही बसला आहे. आर्थिक मंदीमुळे भारतातल्या अनेक बँका तोट्यातून जात आहेत. खातेदारांच्या हिताच्या दृष्टीने रिजर्व बँकेने तोट्यात असलेल्या अनेक बँकांवर निर्बंध लावले. पीएमसी बँकेवर आरबीआयने यापूर्वीच निर्बंध लावले होते. एकेकाळी चांगल्या नफ्यात असलेली  ‘येस बँक’ ही खाजगी बँक आता तोट्यात असल्याने आरबीआयने येस बँकेवरही निर्बध लावत खातेधारकांना १ महिन्यात केवळ ५० हजार रुपये काढण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे खातेधारक आपल्या रकमेबाबत चिंतेत आहेत. याप्रकरणी आता स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे प्रमुख रजनीश कुमार यांनी अजब वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ‘येस बॅंकेच्या सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत. माझ्या पुतण्याचे खातेही एस बँकेतच आहे. त्यामुळे चिंता करू नका. पुढे ते म्हणाले ‘काल ही बातमी आली तेव्हा मला पहिला कॉल माझ्या पुतण्याचा आला. त्याचे येस बँकेत खाते आहे. मी त्याला काळजी करू नका,’ असे सांगितले आहे.

व्यक्ती आणि संस्थांमध्ये फरक करणे आवश्यक

येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार बोर्डात येतील का असे विचारले असता, ते म्हणाले की ‘व्यक्ती आणि उद्योग यांच्यात फरक आहे. येस बँक ही एक संस्था आहे; राणा कपूर एक स्वतंत्र व्यक्ती आहे, जर एखाद्याने चूक केली असेल तर त्याला किंमत मोजावी लागेल.’
दरम्यान, ईडीकडून राणा कपूर यांची चौकशीसाठी चालू आहे. त्यांच्याविरूद्ध पीएमएलएचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काल रात्री ईडीने त्यांच्या घरी छापाही टाकला होता. आरबीआयने येस बँकेवर निर्बंध लावले असून आर्थिक व्यवहार स्थगित केले आहे, त्यामुळे खातेधारकांना सध्यातरी ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढणे शक्य नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाने जेट एअरवेजचे पुनरुज्जीवन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण दुर्दैवाने तो यशस्वी होऊ शकला नाही, असेही कुमार म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -