घरट्रेंडिंगबालदिनानिमित्त गुगलद्वारे आयोजित स्पर्धेत लहानग्यांची कल्पकता ठरली अव्वल!

बालदिनानिमित्त गुगलद्वारे आयोजित स्पर्धेत लहानग्यांची कल्पकता ठरली अव्वल!

Subscribe

यावर्षीच्या स्पर्धेलासुद्धा विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रं, त्यांची कल्पकता आणि सामाजिक विषयाचे भान या स्पर्धेत अव्वल ठरले.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची आज जयंती आहे. जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलं फार आवडत. लहान मुलंसुद्धा त्यांना चाचा म्हणून हाक मारत. त्यामुळे त्यांची जयंती देशात बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. या दिनानिमित्त दरवर्षी गुगलद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या स्पर्धेलासुद्धा विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रं, त्यांची कल्पकता आणि सामाजिक विषयाचे भान या स्पर्धेत अव्वल ठरले.

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी रेखाटली कल्पक चित्रं

गुगलने यंदा गुगल डूडलसाठी विद्यार्थ्यांना ‘when I grow up, I hope…’ हा विषय दिला होता. या स्पर्धेत सात वर्षांच्या दिव्यांशीने रेखाटलेले ‘वॉकिंग ट्री’ या संकल्पनेवरील चित्र डूडलसाठी निवडण्यात आले. स्पर्धेत सहभागी इतर विद्यार्थ्यांनीसुद्धा विविध विषयांवर कल्पकतेने चित्रं रेखाटली आहेत. चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक, पर्यावरण, वैज्ञानिक क्षेत्रातील महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना वयोगटानुसार विषय देण्यात आले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -