घरदेश-विदेशभारतात स्पूटनिक-वी लसीच्या तिसऱ्या ट्रायला हिरवा कंदील

भारतात स्पूटनिक-वी लसीच्या तिसऱ्या ट्रायला हिरवा कंदील

Subscribe

भारतातील डॉ. रेड्डी लॅबॉरटीला सुरु आहे लसीच्या तिसऱ्या फेजमधील ट्रायल

देशभरात आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज देशात पहिल्या टप्प्यात कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. याच दरम्यान आता देशात आता डॉ. रेड्डी लॅबॉरटरीला ‘स्पूटनिक-वी’ या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे देशात आता कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या लसीबरोबरचं तिसरी स्पूटनिक-वी ही लस लवकरच उपलब्ध होणार आहे. स्पूटनिक-वी ही लस रशियाच्या कंपनीने विकसित केली आहे. डीसीजीआईने डॉ. रेड्डी लॅबॉरटीला या लसीच्या तिसऱ्या फेजच्या ट्रायला मंजूरी दिली आहे. स्पूटनिक-वी ही लस तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात १५०० नागरिकांना देण्यात येणार आहे. कोरोनाला हरवण्यासाठी जगभरात २०० हून अधिक कंपन्यांमध्ये लसींवर काम सुरु आहे. ज्यातील ३० कंपन्या भारतात आहेत. भारतात आज सीरम इंस्टिट्यूडची कोविशील्ड लस आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन या दोन लसींना आपतकालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे गुजरातच्या जायकोविड या लसीवर ट्रायलच्या टप्प्यातील काम सुरु आहे. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी भारतात येत्या काळात अनेक लसी उपलब्ध होणार आहे.
डॉ. रेड्डी लॅबॉरटीचे सह-अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी प्रसाद स्पूटनिक-वी या लसीबद्दल माहिती देताना सांगतात, या लसीचा क्विनिकल ट्रायल हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तर डॉ. रेड्डी यांनी सांगितले, याच महिन्यात लसीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील ट्रायलला सुरुवात करणार आहोत. भारतातील नागरिकांना आम्ही सुरक्षित आणि प्रभावी लस देऊ अशी आम्ही आशा करतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -