घरदेश-विदेशजुलैपासून बदलणार ड्राईव्हिंग लायसन

जुलैपासून बदलणार ड्राईव्हिंग लायसन

Subscribe

नव्या बदलात वापरलेल्या प्रणालीचा फायदा वाहतूक पोलिसांनी होणार आहे. त्यांच्याकडे असलेल्या मशीनच्या साहाय्याने त्यांना कार्डची मदत घेत ड्राईव्हर संबधित अधिक माहिती मिळणार आहे.

जर तुम्ही ड्राईव्हिंग लायसनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण जुलै २०१९ पासून तुमचे लायसन बदलणार आहे. देशातील सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे बदल लागू होणार आहेत. ड्राइव्हिंग लायसन आणि आरसीबाबतीत हे बदल होणार असून त्यांचे फिचरही एक सारखे असणार असे कळत आहे. परिवहन मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली असून या बदलाचा फायदा पुढील काळात होईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

काय होणार आहेत बदल?

हे बदल होताना ड्राईव्हिंग लायनसचा रंग, डिझाइनमध्ये बदल होणार असून दोघांची डिझाईन एकच असणार आहे. शिवाय ड्राईव्हिंग लायसन आणि आरसीमध्ये मायक्रोचीप सोबतच क्यूआर कोड देखील असणार आहे. सध्या हे फिचर फक्त एटीएम आणि मेट्रो कार्डमध्येच आहेत.

- Advertisement -

काय होणार फायदा ?

नव्या बदलात वापरलेल्या प्रणालीचा फायदा वाहतूक पोलिसांनी होणार आहे. त्यांच्याकडे असलेल्या मशीनच्या साहाय्याने त्यांना कार्डची मदत घेत ड्राईव्हर संबधित अधिक माहिती मिळणार आहे. यामध्ये ड्राईव्हरने अवयवदान केले आहे का ? ड्राईव्हर विकलांग आहे का ? तो विशेष वाहन चालवत आहे की नाही? या संदर्भात तपास करणे अधिक सोपे जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -