घरदेश-विदेशड्रग्ज विक्रीप्रकरणी स्नॅपडीलविरोधात कायदेशीर कारवाई

ड्रग्ज विक्रीप्रकरणी स्नॅपडीलविरोधात कायदेशीर कारवाई

Subscribe

बेकायदेशीररित्या ड्रग्जची विक्री केल्याप्रकरणी स्नॅपडील आणि लुधियानातील कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. कर्नाटकातील ड्रग्ज कंट्रोल विभागानं ही कारवाई केली आहे.

बेकायदेशीररित्या ड्रग्जची विक्री केल्याप्रकरणी स्नॅपडील आणि लुधियानातील कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. कर्नाटकातील ड्रग्ज कंट्रोल विभागानं ही कारवाई केली आहे. Suhagra 100ची विक्री ऑनलाईन सुरू होती. दरम्यान, Suhagra 100च्या ऑनलाईन विक्रीला बंदी असताना देखील Suhagra 100ची ऑनलाईन विक्री सुरू असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. कायद्याची पायमल्ली केल्यानं ही कारवाई केल्याचं कर्नाटकातील ड्रग्ज कंट्रोलर अमरेश तुंबागी यांनी सांगितलं. बुधवारी पीटीआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. Suhagra 100 तयार करणाऱ्या कंपनीविरोधात देखील ही कारवाई केली जाणार आहे. Suhagra 100 डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकत घेता येत नाही. त्यासाठी काही नियम देखील आखून दिलेले आहेत. पण, त्यानंतर देखील त्याची ऑनलाईन विक्री सुरू होती. अखेर कर्नाटक ड्ग्ज कंट्रोलरनं यावर कारवाई केली आहे. त्यामुळे स्नॅपडीलसह लुधियानातील निर्माता कंपनीला देखील कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

याबाबत स्नॅपडीलनं देखील आपली बाजू मांडली आहे. कायदेशीररित्या कंपनी सर्व सहकार्य करेल. शिवाय, स्नॅपडीलवर काही गोष्टी या थर्ड पार्टी देखील विकल्या जातात. दरम्यान, या विक्रेत्यांकडून कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी प्रयत्न देखील केले जातात. सर्व नियमांना अनुसरून वस्तुंची विक्री केली जाते. अशा शब्दात स्नॅपडीलनं आपली बाजू मांडली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या साऱ्या प्रकरणामध्ये आता काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -