दररोज नशा करून एसी कारमध्येच झोपायचा, पण तो विकेंड शेवटचा ठरला

car drunk man

नेहमीच दारू पिऊन कार पार्किंग बेसमेंटमध्ये झोपायची सवय असणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या विकेंडलाही ही व्यक्ती आपल्या सेकंड होमच्या जागेवर येऊन ही व्यक्ती दारू प्यायली होती. पण हा विकेंड त्या व्यक्तीच्या आयुष्यातील शेवटचा विकेंड ठरला आहे. नॉयडातील बरोला याठिकाणी ही घटना घडली आहे. पण कुटुंबाने या सगळ्या घटनेमध्ये संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.

नॉयडातील बरोला या गावी सेक्टर १०७ मध्ये सुंदर पंडित राहत होते. प्रत्येक विकेंडला ही व्यक्ती आपल्या सेकंड होमच्या ठिकाणी यायची. दारू पिल्यानंतर कारमध्येच एसी लावून झोपण्याची या व्यक्तीला सवय होती. पण यंदा दारूच्या नशेत नेमक काय घडल हे कोणालाच कळल नाही. सकाळी सुंदर पंडित यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न आल्याने अखेर त्या पार्किंगमधील कारच्या ठिकाणी कुटुंबीय पोहचलले. त्याच्या भावाने कारमध्ये डोकावू पाहिले असता कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे लगेचच सुंदर पंडित यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. पण तोवर सुंदर पंडित यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबाने त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन अंतिम संस्कार पुर्ण केले.

गाडीमध्ये कार्बन मोनाक्साईडच्या त्रासाने या व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक कारण पोलिसांनी पुढे केले आहे. कारमधील एसीमधून हा गॅस लिक झाला असावा असा अंदाज आहे. त्यामुळेच एसी चालू असताना दारूच्या नशेत या व्यक्तीला बाहेर पडण्याची संधी मिळाली नसल्याचे प्राथमिक कारण आहे.