घरट्रेंडिंगपंतप्रधान मोदींना जीवे मारेन; दारूड्याची धमकी

पंतप्रधान मोदींना जीवे मारेन; दारूड्याची धमकी

Subscribe

आरोपीने दारू प्यायलेल्या अवस्थेत दिल्ली पोलीस कंट्रोल रुममध्ये फोन करुन, पंतप्रधान मोदांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच भाजपच्या अन्य नेत्यांविषयीही अपशब्द वापरले.

मुख्तार अली नामक एका इसमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याची धमकी देणारा फोन केल्यामुळे, 

भाजपच्या अन्य नेत्यांविषयीही अपशब्द

दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार १६ जानेवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास दिल्लीच्या पोलीस कंट्रोल रूममध्ये एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने पंतप्रधान मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरायला सुरुवात केली आणि थेट त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय त्याने भाजपच्या अन्य नेत्यांविषयीसुद्धा अपमानास्पद तसंच अपशब्द वापरले. दरम्यान, या फोनची गंभीर दखल घेत सुरक्षा यंत्रणांनी फोन कुठून आला होता त्याचं लोकेशन तसंच ज्या नंबरवरुन फोन आला होता त्या नंबरधारकाविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली. तपासानंतर हा फोन नंद पर्वत भागातून आला असल्याचे समोर आले. या माहितीवरुन, पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी मुख्तार अली याला ताब्यात घेतले. शिंपी काम करणाऱ्या मुख्तारने दारूच्या नशेत हा प्रकार केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते याप्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच आरोपी मुख्तार याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -